Maharashtra Politics : ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फक्त एका जागेवर विजय झाला. रायगड लोकसभामध्ये सुनिल तटकरे विजयी झाले, तर बारामती, शिरुर, उस्मानाबादमध्ये उमेदवार पराभूत झाले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढली. सुळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता बारामती विधानसभेवरुन खासदार सुनिल तटकरे यांनी भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी तटकरे यांनी अजित पवार यांच्या विजयाबाबत मोठा दावा केला. तसेच त्यांनी मताधिक्क्याची आकडेवारीही सांगितली.
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
"विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार दीड लाख मताधिक्क्यांनी निवडून येतील. बारामतीची जनता सुज्ञ आहे, अजितदादांनी गेल्या ३० वर्षापासून तिथे विकासाची कामे केली आहेत. त्याची माहिती सगळ्यांना आहे, असंही खासदार सुनिल तटकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे नॅरेटीव्ह सेट केले होते, देशात, राज्यातील वेगवेगळ्या विभागातही सेट केले होते. आम्ही याबाबत आता मंथन केले आहे. जेव्हा आता विधानसभा निवडणुका सुरू होतील तेव्हा आम्ही एनडीए'सोबत मजबुतीने निवडणुकांना समोरे जाऊ, असंही तटकरे म्हणाले.
विधानसभा निवडणुका एकत्र लढणार
सुनिल तटकरे म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रित लढणार आहे. या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्ही दिल्लीत याबाबत चर्चा केली आहे, असंही तटकरे म्हणाले.
"आता येणाऱ्या काही दिवसातच आम्ही तिनही पक्षाचे नेते एकत्र बसून विधानसभा निवडणुकीबीबत चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ४०० पार वर केलेल्या विधानावर बोलताना तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुभवी राजकारणी आहेत, त्यांच्या पक्षाने लोकसभेत ७ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्याकडे खूप अनुभव आहे त्यामुळे ते जे बोलत आहेत ते बरोबर आहे.
लोकसभेला अजित पवारांना टार्गेट केलं
सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या ७-८ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत वेगळा संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा केला, कुणीही आत्मविश्वास गमावला नाही. लवकरच आम्ही राज्याचा दौरा करणार आहोत. अधिवेशनानंतर अजित पवारही राज्यभरात फिरतात. सोशल मीडियावर जो अपप्रचार केला जात आहे त्याबाबत आम्ही सतर्क आहोत. अजितदादांना टार्गेट करण्याची विशेष मोहिम काहींकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. आमदारांची बैठकीत सगळे आमदार उपस्थित होते. केवळ नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय असं त्यांनी सांगितले.