Join us  

Maharashtra Politics: Video : अजित पवार मुख्यमंत्री म्हणून आवडतील का? अमृता फडणवीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 7:47 PM

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. राज्याचं राजकारण सध्या अजित पवार यांच्याभोवतीच फिरत आहे. तर अजित पवारांनी पुण्यातील राष्ट्रवादीचे काही पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आला. तर काल एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदा संदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री व्हायला नक्की आवडेल असं विधान केलं. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली.  (Maharashtra Politics)

Maharashtra Politics: अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात...; संजय राऊत स्पष्टच बोलले

आज अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदा संदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. अमृता फडणवीस म्हणाल्या, मला मुख्यमंत्री कोणही झालेलं आवडेल. ज्यांनी राज्यात नीट काम केलं. २४ तास महाराष्ट्रासाठी झोकून काम केलं. त्यांच्यापाठिशी मी उभी राहिलं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.    काल अजित पवार नेमकं काय म्हणाले? 

काल एका मुलाखतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. त्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. काँग्रेसची लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर २००४ मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते असं त्यांनी सांगितले.  (Maharashtra Politics)

तसेच आम्हाला संधी मिळाली नाही, प्रयत्न करणे काम असते. मतदारांचा कौल मिळणे हे जनतेचे काम असते. त्यानंतर काळात नेहमीच आम्ही दोन नंबरला राहिला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद काँग्रेसला आणि उपमुख्यमंत्रिपद आमच्याकडे आले. २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीची मुख्यमंत्रिपद मिळवण्याची तयारी आहे असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :अजित पवारअमृता फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेस