Join us  

Maharashtra Politics : 'अजित पवारांबाबतची स्क्रिप्ट भाजपने लिहिली, फडणवीसांच मौन का?; सुषमा अंधारेंनी सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 3:52 PM

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत.

Maharashtra Politics :  मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नियोजित कार्यक्रमांना गैरहजेरी लावली. त्यामुळे आणखी या चर्चांनी जोर धरला. अखेर काल स्वत: अजित पवार माध्यमांसमोर येत मी नाराज नसल्याचे स्पष्ट केले. आता नाराजीच्या चर्चांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी या चर्चेच्या मागे भाजपचा हात असल्याचा आरोपही केला. 

Maharashtra Politics : अजित पवार भाजपच्या संपर्कात आहेत का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

सुषमा अंधारे म्हणाल्या, अजित पवारांबाबतची स्क्रिप्ट भाजपने लिहिली आहे. या स्क्रिप्ट संदर्भात देवेंद्र फडणवीस सर्व सांगू शकतील. महाविकास आघाडीची वज्रमुठ सभेची भाजपला भीती वाटत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची अगोदरच्या प्रतिक्रिया आणि आताच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या आहेत. (Maharashtra Politics )

"खेड आणि मालेगावच्या सभेनंतर भाजपला भीती वाटत आहे. आता या सगळ्यात देवेंद्र फडणवीस कमालीचे शांत आहेत. अजित पवार यांच्याबाबतची स्क्रिप्ट फडणीस यांनी लिहिली आहे. त्यामुळे ते या संदर्भात सांगू शकतील असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. 

अजित पवार भाजपच्या संपर्कात आहेत का?

 

 अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द केल्यामुळे या चर्चांना जोर आला. पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी सोडून काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. दरम्यान काल पवार यांनी स्वत: पत्रकार परिषदत घेत या चर्चांना पूर्णविराम दिला. पण, पवार खरच भाजपच्या संपर्कात आहेत का अशा चर्चा अजुनही सुरूच आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबईत रस्त्यासाठी लागणाऱ्या खडीची कामे एकाच कंपनीला का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपकडे (BJP) अजुनही कोणताही असा प्रस्ताव आलेला नाही. अजित पवार यांच्याविषयी अशा चर्चा कोण घडवून आणतंय हे पहावा लागणार आहे. अजितदादा यांनीही कधीही भाजपशी संपर्क केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या इमेजला डॅमेज होईल अशी चुकीची माहिती मी सांगणार नाही. या चुकीच्या बातम्या करण्यात आल्या, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीसशिवसेना