Join us

विठ्ठला, सांभाळून घे, भुजबळांचे पवार यांच्यासमोर उद्गार; वाय बी चव्हाण सेंटरमधील इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 6:36 PM

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. दोन दिवसापूर्वी या मंत्र्यांना खात्यांचे वाटपही करण्यात आले आहे. उद्यापासून विधीमंडळीचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी अपडेट समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेते खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. या दरम्यान,  वाय बी चव्हाण सेंटरमध्ये नेमकी काय चर्चा झाली ती इनसाईड स्टोरी समोर आली आहे.  

अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला; वाय बी चव्हाण सेंटरमध्ये काय खलबतं? जयंत पाटलांनी सांगितला घटनाक्रम

सुरुवातील अजित पवार यांच्या गटातील सर्वच नेते वाय बी चव्हाण सेंटरकडे आले. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ खासदार शरद पवार यांच्या समोर आले आणि म्हणाले विठ्ठला सांभाळून घे आम्हाला असं म्हणून पवारांच्या पाया पडले. त्यांच्या पाठोपाठ सर्वच नेते शरद पवारांच्या पाया पडले. यावेळी अजित पवार गटातील नेत्यांनी खंत व्यक्त केली, सर्वांना एकसंघ राहिला पाहिजे. पाठिंबा द्यायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. यावेळी पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

यावेळी सर्वच नेत्यांनी खासदार शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. पण शरद पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आता शरद पवार या प्रस्तावावर कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाच ठरणार आहे. 

जयंत पाटलांनी सांगितला घटनाक्रम

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्षांची बैठक सुरू होती तेव्हा अचानक सुप्रिया सुळे यांचा मला फोन आला, त्यांनी मला वाय बी चव्हाण सेंटरला यायला सांगितलं. या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतलेले नऊ नेते हे सर्व उपस्थित होते. त्यांनी शरद पवार साहेब यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली. यावेळी त्यांनी यावर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 

'आता ते येऊन भेटले हे अनपेक्षित आहे. शरद पवार यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा यावर चर्चा होईल. त्या नऊ मंत्र्यांनी पवार साहेबांच्याकडे कंत व्यक्त करुन दिलगीरी व्यक्त केली. लार्जर इटरेस्ट ठेऊन सगळ्यांना एकत्र कराव अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली, यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार