'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 06:08 PM2024-09-25T18:08:55+5:302024-09-25T18:11:02+5:30

Eknath Shinde : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार होतील, याआधीच आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

maharashtra politics Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | 'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून त्याआधीच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'लोक मला म्हणताता, तुम्ही झोपता कधी, जेवता कधी. मी त्यांना सांगतो की ही जनताच माझी ऊर्जा आहे. मी मुख्यमंत्री नाही, सामान्य माणूस आहेट, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 

“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार

 लोकसभेतील निकालावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही मूळ आहोत, असे म्हणणाऱ्यांना आम्ही मागे टाकले आहे. ठाकरे गटाचा स्ट्राइक रेट ४० टक्के होता आणि आमचा ४७ टक्के होता. शिवसेना आणि यूबीटी आमनेसामने असलेल्या १३ जागांवर आम्हाला जास्त मते मिळाली. मूळ शिवसेना कोणाची आहे हे लोकांनी पक्के केले आहे. शिवसेनेच्या व्होटबेसमधील सर्वाधिक मते आपल्या पक्षाकडे आल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

"उबाठाला जी मते मिळाली ती शिवसेनेची नसून काँग्रेसची आहेत. विधानसभा निवडणुकीतही जनता हे सिद्ध करेल, फेक नॅरेटीव्ह पुन्हा चालत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेने ते ओळखले आहे आणि म्हणूनच आम्ही काम करत आहोत, असंही शिंदे म्हणाले. 

सीएम शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. शिंदे म्हणाले की, जनतेने निवडणुकीत शिवसेना आणि भाजप सरकारला जनादेश दिला आहे. पण स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडून जनतेला न आवडणारे सरकार स्थापन केले. जनतेने दिलेला जनादेश महायुतीला होता मात्र आघाडीचे सरकार स्थापन झाल्याचे शिंदे म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीत लोक महायुतीला मतदान करतील

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि शिवसेना (यूबीटी) यांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने 31 जागा जिंकल्या, तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने केवळ 17 जागा जिंकल्या. याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत त्यात सुधारणा केली जाईल. लोकांना घाबरवून मते घेतली पण लोक मदतीला गेले तेव्हा त्यांनी हात वर केले. विधानसभा निवडणुकीत लोक कल्याणकारी योजना आणि विकासासाठी महायुतीला मतदान करतील, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयबाबात बोलताना शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत त्यात सुधारणा केली जाईल. लोकांना घाबरवून मते घेतली पण लोक मदतीला गेले तेव्हा त्यांनी हात वर केले. विधानसभा निवडणुकीत लोक कल्याणकारी योजना आणि विकासासाठी महायुतीला मतदान करतील, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

Web Title: maharashtra politics Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.