Join us  

वादग्रस्त विधानानंतर राज्यपालांचा दिल्ली दौरा; राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 4:55 PM

गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केल्यासंदर्भात त्यांच्यावर राज्यभरातून टीका सुरू आहेत.

गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केल्यासंदर्भात त्यांच्यावर राज्यभरातून टीका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, या पार्श्वभूमिवर आता राज्यपाल कोश्यारी यांचा  दिल्ली दौरा होणार आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा २४,२५ नोव्हेंबर रोजी दिल्ली दौरा आहे. ते नियोजित दौऱ्यावर जाणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते कोश्यारी यांची कानउघडणी करणार का अशी चर्चा सुरू आहे. 

“जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

राज्यपाल कोश्यारी यांची वारंवार वादग्रस्त वक्तव्य सुरू आहेत. गेल्या काही महिन्यापासून त्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. त्यांचे उत्तर भारतात नियोजित दौरे असल्याचे बोलण्यात येत आहे. 

“जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. यातच आता महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त राज्यपाल कोश्यारींना तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. छत्रपत्री शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेली विधाने संतापजनक असून, जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. केंद्र सरकारने विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे, अशी आमची मागणी आहे, असे अशोक चव्हाण यांनी नमूद केले.

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीभाजपानरेंद्र मोदी