Join us

शिवसेना-भाजपचा महापौर व्हावा म्हणून शिंदे, फडणवीसांनी कंबर कसली, शिंदे गटातही विभागप्रमुख

By मनोहर कुंभेजकर | Published: August 26, 2022 2:41 PM

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून पालिकेत शिवसेना-भाजपचा महापौर विराजमान व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे

मुंबई - शिवसेनेत विभागप्रमुख, महिला विभाग संघटक, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, महिला विभागसंघटक, पुरुष व महिला उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख अशी रचना आहे. शिवसेनेचे मुंबईत 13 पुरुष विभागप्रमुख आहेत. त्याच प्रमाणे आता शिंदे गटाने मुंबईत आपले बस्तान बसवण्यासाठी विभागप्रमुख पद निर्माण केले आहे. 

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून पालिकेत शिवसेना-भाजपचा महापौर विराजमान व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे.

मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची मुख्य नेता, शिवसेन्स एकनाथ शिंदे यांनी आपल्या १२ ऑगस्टच्या पत्राद्वारे त्यांची विभाग क्रमांक १ च्या विभागप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आपली विभाग क्रमांक १ च्या विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात येत आहे.

शिवसेनाप्रमुखांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा प्रचार व प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला. आता त्यांच्यावर दहिसर, बोरिवली व कांदिवली या भागांची विभागप्रमुख नात्याने आगामी पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी असेल. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनादेवेंद्र फडणवीसभाजपा