Join us

Ajit Pawar: उद्योगपती गौतम अदानी- खासदार शरद पवारांच्या भेटीवर अजित पवार म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 11:24 AM

 काल प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर येऊन भेट घेतली.

मुंबई-  काल प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर येऊन भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान त्यांच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याभेटवरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar : कोण संजय राऊत?, उगाच कोणाच्या अंगाला का लागावं?; अजित पवार यांचा टोला 

शरद पवार आणि अदानी यांच्या भेटीवर विरोधकांनी पवार यांच्यावर आरोप करत टीका केली. यावरुनन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी एका मुलाखतीत हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणी गौतम अदानी यांची बाजू घेतली होती. यावेळीही राजकीय वर्तुळात आरोप झाले होता, आता काल अदानी यांनी घेतलेल्या भेटीनंतरही पवार यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. 

अजित पवार म्हणाले, शरद पवार यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली नाही. अदानी शरद पवार यांच्याकडे आले होते. उद्या कोणावर काही आरोप झाले. तर तो व्यक्ती कोणाचीही भेट घेऊ शकतो. आता ही भेट कशासाठी घेतली हे अजुनही समोर आलेले नाही.  शरद पवार आणि गौतम अदानी यांची ओळख आहे, हे सर्वांना माहित आहे. ओळखीच्या व्यक्तीला भेटणे यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. राज्यपालांच्या पत्रावर भाष्य"खारघरसंदर्भात मी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. सरकारनं त्यात मृतांचा आकडा घोषित केला आहे. निश्चित आकडा मिळत नाही. परंतु काही लोक दबक्या आवाजात त्या उष्माघातात तिकडे काही लोकांना काही गोष्टी मिळाल्या नाही असं म्हणतात. मी पोस्टमार्टमचा रिपोर्ट माहितीच्या अधिकारात मागवली आहे. पण काही म्हणतात जी संख्या सांगितली जातात त्यात तफावत आहे असं म्हणतात," असंही अजित पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून यावेळी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यांनी सर्व टीम तिकडे राबत होती. राज्याचे प्रमुखही तिकडे जात होते. असं असतानाही तिकडे लोकांना पाणी का मिळालं नाही अशी ऐकव बातमी आहे. सर्व गंभीर बाब आहे, म्हणून मी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केली.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारगौतम अदानी