मुंबई- गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. यावरुन आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! नवी योजना होणार सुरू, खातेधारकांना होणार फायदा
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. अजित पवार यांच्यात ती क्षमता आहे. पवार गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात आहेत. अजित पवार यांनी सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांना वाटतं आपण मुख्यमंत्री व्हायला हवं, अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. याला काय म्हणताता जुगाड करुन तोडफोड करुन मुख्यमंत्री होत असतात, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. (Maharashtra Politics)
अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. त्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. काँग्रेसची लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर २००४ मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्हाला संधी मिळाली नाही, प्रयत्न करणे काम असते. मतदारांचा कौल मिळणे हे जनतेचे काम असते. त्यानंतर काळात नेहमीच आम्ही दोन नंबरला राहिला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद काँग्रेसला आणि उपमुख्यमंत्रिपद आमच्याकडे आले. २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीची मुख्यमंत्रिपद मिळवण्याची तयारी आहे असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितले.