Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 12:05 AM2024-06-15T00:05:12+5:302024-06-15T00:08:18+5:30
Chhagan Bhujbal : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भुजबळ यांनी काही दिवसापूर्वी महायुतीविरोधात काही विधाने केली होती.
Chhagan Bhujbal ( Marathi News ): गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आधी नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरुन तर आता राज्यसभेच्या जागेवरुन ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी महायुतीच्या विरोधात काही विधानेही केली होती. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चां जोरदार सुरू होत्या, ते काही दिवसातच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या चर्चांवर आज भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उद्धव सेनेला भाईंदर मधून धक्का, युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका शिंदे सेनेत दाखल
टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. यावेळी छगन भुजबळ यांना तुम्हाला आता अजित पवार गटात येण्याचा निर्णय चुकला का? असा प्रश्न विचारला. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, “तुम्हाला वाटत असेल. मला नाही वाटत. मी जे बोललो. ते मतपेटीने दाखवून दिलं".
शरद पवारांसोबत जाणार का?
यावेळी छगन भुजबळ यांना शरद पवार गटाकडे जाण्याचा दरवाजा उघडा ठेवला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “असं तुम्हाला वाटतं. हा तुमचा प्रचार आहे. या सर्वात मी नेहमी सत्याची बाजू घेत आलो आहे. मला जे वाटतं खरं आहे, तेच बोलतो. मला वाटलं की या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. तेव्हा सांगतो मला उत्तर नाही द्यायचं. असं काही नाही. ना माझी खिडकी उघडी आहे ना माझा दरवाजा उघडा आहे. ना कोणी माझ्यासाठी रेड कार्पेट टाकलं आहे, असं काही नाही, असं सांगत कुठेही जाणार नसल्याचं सांगितलं.
"वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन पुढची पावलं टाकायची आहे. त्यातून काही धडा घ्यायचा आहे. पक्षाला आणि युतीला. ज्या त्रुटी आहे, त्या दूर करायच्या आहेत. मी आहे त्या पक्षात युतीसोबत राहणार आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.