Join us  

'नाराजी नाही, अजितदादा आल्याने सरकार मजबूत...; राजीनाम्याच्या चर्चांवर CM शिंदेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 5:09 PM

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई-  रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, अजित पवार  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे यामुळे शिवसेनेतील नेते नाराज असल्याच्या सुरू झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच बोललं जात होतं. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजितदादा यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. अजितदादा आमच्यात आल्यामुळे शिवसेनेत नाराजी नाही. सरकार आणखी मजबूत झाले आहे. आम्ही नाराज असल्याच्या अफवा विरोधकांकडून करण्यात येत आहेत.तुम्ही तुमच घर बघा, तुमचं घर तर तुटलं आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.

'जे झालेय ती राजकीय तडजोड'; एकनाथ शिंदेंनी नाराज आमदारांनी काय समजावले? 

'आम्हाला गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा आहे,  महाविकास आघाडी सरकारने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. जेव्हापासून मी आणि देवेंद्रजी काम करत आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी करत आहे. अफवा पसरवणाऱ्यांची मर्यादा काय आहेत ते बघा, सर्व मर्यादा त्यांनी तोडल्या आहेत. विरोधकांचा जळफळाट होऊन अशा अफवा पसरवत आहेत, असंही शिंदे म्हणाले.  

'डबल इंजिन सरकारमुळे राज्यात विकास होत आहे. राज्यात जोरदार विकास होत आहे. अजित पवार यांना आमची विकासाची भूमिका पटली आहे, म्हणून ते आमच्यासोबत आले आहेत, माझ्या राजीनाम्याची अफवा आहे,असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

काल रात्री शिंदे गटातील आमदारांची मुंबईत बैठक झाली, या बैठकीत शिंदे गटातील आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. तर काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही जाणार होते, पण, अचानक हा दौरा शिंदे यांनी रद्द केला. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

  

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस