Join us  

Maharashtra Politics : मालवणमध्ये राजकीय गोंधळ, तटकरेंनी राणेंना फटकारलं, देवेंद्र फडणवीसांनी बाजू घेतली; महायुतीत सूर जुळेनात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 5:31 PM

Maharashtra Politics : काल महाविकास आघाडीतील नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर भेट दिली. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

Maharashtra Politics ( Marathi News ) :  काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना समोर आली. या प्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल बुधवारी महाविकास आघाडीने राजकोट किल्ल्यावर मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने-सामने आले होते. दरम्यान, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. यावेळी खासदार नारायण राणे, निलेश राणे आणि ठाकरे गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. आता या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महायुतीमध्ये या प्रकरणावरुन सूर जुळत नसल्याचे दिसत आहे. 

CM शिंदेंच्या आमदाराची गाडी धुताना पोलीस कर्मचारी कॅमेरात कैद; काँग्रेस नेत्याने समोर आणला व्हिडीओ

राजकोटवरील गोंधळानंतर खासदार नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आक्रमक भाषा वापरत ठाकरे गटावर टीका केली. यावेळी राणे म्हणाले,  'आम्ही काहीही केले नाही. आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो. आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते. तेव्हा त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले. आम्ही काहीच केले नव्हते. आम्हाला काही करायचे असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही ओ, एकही पोहोचू शकला नसता घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का?,असंही राणे म्हणाले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेंची बाजू घेतली

दरम्यान, या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नारायण राणे यांची बाजू घेतल्याचे दिसत आहे. फडणवीस म्हणाले, कोणी काय केले त्यावर आज बोलणार नाही. पण माझी सगळ्यांनाच विनंती आणि सूचना आहे की, त्यांनी या विषयात राजकारण करू नये. राणेंवर बोलताना फडणवीस म्हणाले की, नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे. ते आक्रमकपणे बोलतात पण त्यांना धमकी द्यायची असेल, असे मला वाटत नाही. 

खासदार सुनिल तटकरेंनी राणेंना फटकारलं

राजकोट येथील गोंधळानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी खासदार नारायण राणे यांना फटकारलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नारायण राणे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, जबाबदार नेत्यांकडून या पद्धतीचं केलेलं विधान मला तरी अभिप्रेत नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. हे योग्य नाही, असं सांगत तटकरे यांनी फटकारलं राणे यांना फटकारलं आहे. 

अजित पवार गटाचा राज्यभर निषेध मोर्चा

राजकोट किल्ल्यावरील घटनेवरुन आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निदर्शने केली. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबाबत राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे तरीही आज निदर्शने करण्यात आली आहेत. यामुळे आता राष्ट्रवादीने राज्यसरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :सुनील तटकरेनारायण राणे राष्ट्रवादी काँग्रेसभाजपादेवेंद्र फडणवीस