Join us  

धनुष्यबाणसाठी बहुमत गरजेचे, जे एकनाथ शिंदेंकडे आहे; वकिलांचा निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 5:32 PM

शिवेसेनेत मोठं बंड झाल्यानंतर आता शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. खरी शिवसेना कोणाची यावरुन कोर्टात सुनावणी सुरू आहे.

शिवेसेनेत मोठं बंड झाल्यानंतर आता शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. खरी शिवसेना कोणाची यावरुन कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज या संदर्भात सुनावणी झाली, आता पुढची सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर आज धनुष्यबाण चिन्हासाठीही निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यात दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आले. 

आज कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्हावरील  सुनावणी सर्वाच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत निर्णय देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत आयोगात सुनावणी नको अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरेंकडील शिवसेना पक्षप्रमुखपद बेकायदेशीर; निवडणूक आयोगासमोर मोठा दावा

शिंदे गटाकडून वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आज कोणीही अपात्र ठरलण्यात आलेले नाही, त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचे आहे. हे ठरलवण्यास अडचण नाही, अशी मागणी महेश जेठमलानी यांनी केली. आयोगाने यावर एकत्र देणार असल्याचे म्हटले. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर हा युक्तिवाद सुरू आहे. 

आमदार आणि खासदारांची जास्त संख्या आमच्या बाजूनेच आहे, घटनेच्या चौकटीत या संख्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकीलांनी केला आहे.  

उद्धव ठाकरेंकडील शिवसेना पक्षप्रमुखपद बेकायदेशीर; निवडणूक आयोगासमोर मोठा दावा

शिवसेना कुणाची अन् धनुष्यबाण कुणाचा याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी शिंदे-ठाकरे गटाने आयोगासमोर युक्तिवाद केला. त्यात शिंदे गटाच्या वकिलांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदावर प्रश्नचिन्ह उभे केले. शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरें केंद्रीत आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत बेकायदेशीर आणि बोगस बदल केले असा दावा महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर मांडला. 

या युक्तिवादात महेश जेठमलानी म्हणाले की, शिवसेनेची जुनी घटना ही बाळासाहेब ठाकरेंभोवती केंद्रित होती. जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून राष्ट्रीय कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी बोगसपणे घटनेत बदल केला. उद्धव ठाकरेंनी स्वत:कडे अधिकार ठेवणे हे बेकायदेशीर आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद उद्धव ठाकरेंनी स्वत:कडे ठेवले. शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या पदाला अर्थ नाही असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे