Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 07:29 PM2023-04-20T19:29:20+5:302023-04-20T19:34:14+5:30

Maharashtra Politics : राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.

Maharashtra Politics Sushma Andhare claimed that the resignation of Chief Minister Eknath Shinde has been published in a newspaper of Gujarat | Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

googlenewsNext

Maharashtra Politics : मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना राजीनामा तयार ठेवण्याच्या दिल्लीतून सूचना देण्यात आल्याची बातमी गुजरातमधील वृत्तपत्रात छापून आल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज केला आहे. या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा दावा केला आहे.   

अनेक प्रलंबित विषयांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; सकारात्कम प्रतिसाद मिळाला- राज ठाकरे

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा दोन दिवसापासून सुरू आहे. अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. या चर्चांना काल अजित पवार यांनी पूर्णविराम देत मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आता शिवेसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक मोठा दावा केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 

सुषमा अंधारे म्हणाल्या, गुजरातमधील एका वृत्तपत्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संदर्भात एक बातमी छापून आली आहे. या बातमीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना  दिल्लीतून देण्यात आल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. भाजप एकनाथ शिंदे यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकते. यावर अजुनही नार्वेकरांना स्पष्ट भूमीका मांडलेली नाही. याचाच अर्थ भाजपने पडद्याआड ही ठरलेली रणनीती आहे. 

काही दिवसातच शिवसेनेतील १६ आमदारांच्या संदर्भातील निकास सुप्रीम कोर्ट देणार आहे. यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चाव सुरू आहेत.  

Web Title: Maharashtra Politics Sushma Andhare claimed that the resignation of Chief Minister Eknath Shinde has been published in a newspaper of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.