Join us  

Maharashtra Politics: ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते, 'त्या' योजनेचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 5:20 PM

Maharashtra Politics: महाविकास आघाडी सरकार मला अटक करण्याच्या तयारीत होते, मला कोणत्याही प्रकरणात अडकवून सरकार मला अटक करणार होते, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

मुंबई-  Maharashtra Politics: 'महाविकास आघाडी सरकार मला अटक करण्याच्या तयारीत होते, मला कोणत्याही प्रकरणात अडकवून सरकार मला अटक करणार होते, असा दावा गेल्या काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्या अटकेसाठी महाविकास आघाडी सरकार अटक करणार होते. त्या योजनेचा मी साक्षीदार आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या दाव्यावरुन आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

EVM मशीन सॅटेलाइटद्वारे भाजपाकडून नियंत्रित केल्या जातात, चंद्रकांत खैरेंचा मोठा आरोप; अमित शहांच्या विधानाचा दिला दाखला

यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे सरकार राजकीय सुडापोटी कारवाई करत नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोट बोलत आहेत, असं खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

'मला अटक करण्याचा आदेश वरुन आला होता'

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता, हे काम तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले गेले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. त्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर आता पुन्हा फडणवीसांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले होते की, 'महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असे टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते.' यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी यांनी हे आरोप फेटाळून लावले.  (Maharashtra Politics)

 

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस