मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली. याबद्दल देशभरात चर्चा सुरू आहे. यावर आज खासदार संजय राऊत यांनी टीका केली. 'दहशतवाद कमी केला मग मणिपूरला काय सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्था एकाच उद्योगपतीच्या हातात दिल्यामुळे अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती आहे. दोनवेळा नोटबंदी करुन का फसली. रुपया का पडत आहे, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केली. देशाच नुकसान का झाल? या अनेक गोष्टी आहेत त्या लवकरच बाहेर येतील, असंही संजय राऊत म्हणाले.
शिंदे गटातील अनेक खासदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत, त्यांना ठाकरे गटाच्या किंवा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढायची आहे, असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते. यावर संजय राऊत म्हणाले, जयंत पाटील यांनी सांगितलेले हे शंभर टक्के सत्य आहे. पण, ते मी सांगितल्यावर समोरचे प्रवक्ते हुत्कार सोडतील. जयंत पाटील तेच सांगत आहे. प्रत्येकाला हाची खात्री आहे. शिंदे गटातील खासदारांना भाजपच्या चिन्हावरच लढावे लागेल अशी भाजपची इच्छा आहे. यावर त्यांनी उत्तर जयंत पाटील यांना द्यायला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
'सुषमा अंधारेंच्या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी आमदार संजय शीरसाट यांना क्लिन चीट दिली आहे, यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले, सरकार त्यांच आहे, गृहखातं त्यांच्याकडे आहे. जंतरमंतर सारख्या ठिकाणी मुलीसमोर आहे तरीही गुन्हा दाखल केला जात नाही. कायद्यावर सुद्धा ही लोक मालकी हक्क दाखवत आहे, अशा पद्धतीचाच महाराष्ट्रात कारऊार सुरू आहे. सरकारला हे प्रकरण गंभीर वाटत नसेल तर सगळच गंभीर आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
'देशभक्त पक्ष एकत्र येत आहेत. पाटण्यामध्ये एकत्र येत बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मोदी सरकार विरुद्ध विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, असंही राऊत म्हणाले.