'आता काही बदल नाही, तिघंही आहोत त्याच पदावर कायम राहणार आहोत'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:20 PM2023-08-03T14:20:50+5:302023-08-03T14:21:34+5:30

आज काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

maharashtra politics 'There is no change now, all three will remain in the same position'; Devendra Fadnavis said clearly | 'आता काही बदल नाही, तिघंही आहोत त्याच पदावर कायम राहणार आहोत'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

'आता काही बदल नाही, तिघंही आहोत त्याच पदावर कायम राहणार आहोत'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

मुंबई- विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती. या जागेवर आज काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभाग्रहात आज त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर चिमटे काढले. 

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला चिमटा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राज्याला विरोधी पक्षनेतेपदाची परंपरा लाभलेली आहे. आता या महत्वाच्या पदावर विजय वड्डेटीवर यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. या पदाचा मान सन्मान वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतील. विदर्भाचे प्रश्न किंवा राज्याचे प्रश्न असतील ते नेहमी आवाज उठवतात. यावेळी बोलताना फडणवीस यांनी वड्डेटीवर यांच्या राजकीय प्रवासाची माहिती देऊन त्यांचे अभिनंदन केले. 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्याच महत्वाच काम असतं. सुरुवातीला ते काम करत असताना एनएसयुआयमध्ये काम करु लागले. यानंतर त्यांनी शिवसेनेतून काम सुरू केले. जिल्हा परिषदेत त्यांनी काम केलं.  काँग्रेसने त्यांना विविध खात्याचे राज्यमंत्री केलं. मागच्या टर्ममध्ये त्यांनी कमी काळासाठी विरोधी पक्षनेते सांभाळलं. 

"२०१९ साल हे वेगळ्या प्रकारच वर्ष आहे अनेकांनी अनेक विक्रम केलेत. पहिले हिरो आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांनी सत्ता परिवर्तन केलं आणि ते मुख्यमंत्री म्हणून कारभार चालवत आहेत. यानंतर दुसरे हिरो म्हणजे आमचे अजितदादा आहेत. पहिल्यांदा माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर उद्धव साहेबांसोबत उपमुख्यमंत्री झाले, नंतर विरोधीपक्षनेते झाले आणि आता आमच्यासोबत उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याखालोखाल मी आहे अगोदर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मग विरोधी पक्षनेता झाला, मग उपमुख्यमंत्री झालो आता यात काही बदल नाही. आता आम्ही ज्या पदावर आहे त्याच पदावर राहणार आहे. आता जी जबाबदारी मिळाली त्यात समाधान आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

'विजय वड्डेटीवारांना चांगल खाते मिळेल असं वाटतं होतं...

" त्यावेळी विरोधी पक्षनेते पदावर चांगल काम केलं म्हणून नव्या मंत्रिमंडळामध्ये विजय वड्डेटीवार यांना चांगले खाते मिळेल असं आम्हाला वाटतं होतं. पण तसं झालं नाही. वड्डेटीवार यांना राज्यमंत्रीपद मिळालं. यानंतर ते नाराज असल्याच्या बातम्या आम्हाला वाचायला मिळाल्या. पण, शेवटी वड्डेटीवर यांनी ते खातं स्विकारले आणि या खात्यात त्यांनी चांगलं काम केलं, वड्डेटीवार यांच नाव घोषित करण्यासाठी खूप वेळ केला पण आता संग्राम भाऊ यांचे आता काय होणार आता काय माहित, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. दिल्लीतून काँग्रेसमधून आलेली चिठ्ठी कुठे जाते काहीच कळतं नाही. शेवटी ज्याला कुठे न्याय मिळतं नाही त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.  

Web Title: maharashtra politics 'There is no change now, all three will remain in the same position'; Devendra Fadnavis said clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.