माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, काल एका मुलाखतीत अजित पवार यांनी शिवतारे यांचा पराभव का केला या संदर्भात भाष्य केलं. 'शिवतारे हे खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नेहमी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते. पवार साहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर बघून स्वत:च्या अंगावर येईल थुंकी असं आहे. यामुळे त्यांच्याबाबत बोलताना तारतम्य बाळगा, जर कुणाला मस्ती आली, तर ती मस्ती जिरवण्याची ताकद आपल्यात आहे, असं अजित पवार काल म्हणाले. यावर आता शिवतारे यांनी प्रत्युत्तर देत पवार यांच्या टीका केली.
कोची दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, केरळमध्ये हाय अलर्ट
विजय शिवतारे म्हणाले, त्यांनी माझा पराभव कटकारस्तान करुन केला. यात उद्धव ठाकरेही सहभागी होते. विधानसभेच्या अगोदर त्यांनी हा सगळा घात केला. अशा पद्धतीने घात करण्यापेक्षा उघड्या छातीने या. मग तुम्हाला विजय शिवतारे कोण आहेत हे समजेल. मी त्यांना आपर्यंत काही बोलत नव्हतो. पण, मी इतिहास घडवेन. बारामती लोकसभेचे लोक महत्वाची आहेत तुम्ही कोण आहेत, असंही शिवतारे म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले होते?
एका मुलाखतीत अजित पवार यांनी शिवतारे यांच्या परभावाचा किस्सा सांगितला. पवार म्हणाले, “माझी ही भाषा पहिल्यापासून नाही. परंतु, आम्हाला तशी भाषा वापरण्याकरता प्रवृत्त केलं जातं. पुरंदरमध्ये सुप्रिया सुळे आणि आमचे दैवत शरद पवारांबाबत खालच्या पातळीर जाऊन विजय शिवतारे टीका करायचे. पवारांसाहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर बघून स्वतःच्या अंगावर येईल थुंकी असं आहे. सुप्रियासुद्धा उत्तम संसदपटू आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न ती संसदेत मांडते. असं असतानाही महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राला यशवंतरावांनी काही विचार दिले आहेत. त्यानुसार, महिलांकडे बघण्याचा, त्यांच्याबाबत बोलण्याचा, भाषेबाबत काही तारतम्य बाळगा ना. जर कुणाला मस्ती आली, तर ती मस्ती जिरवण्याची ताकद आपल्यात आहे”, असं अजित पवार म्हणाले.