Join us  

Maharashtra Politics : राज ठाकरेंना महायुतीमध्ये सोबत घेणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 5:27 PM

Maharashtra Politics : भाजप-शिवसेना युती एकत्रीत निवडणुका लढवणार आहेत. या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामील करुन घेणार का? अशा चर्चा सुरू आहेत.

Maharashtra Politics :  मुंबई- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन काही महिने झाले. आता राज्यात होणाऱ्या निवडणुकांवरुन चर्चा सुरू झाल्या आहेत. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. भाजप-शिवसेना युती एकत्रीत निवडणुका लढवणार आहेत. या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामील करुन घेणार का? अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले; ऐका रामदास आठवले काय म्हटले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुकीचा भाग वेगळा आणि हिंदुत्वाचा भाग वेगळा आहे, आम्ही आमच्या मार्गाने निघालो आहे. ज्यांना आमच्या मार्गाने यायचे आहे, त्यांना आमच्या मार्गाने यावं. आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना सुरू केल्या आहेत. आम्ही आमच काम दाखवून लोकांच्यात जाणार, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमच्या संपर्कात अजुनही अनेक आमदार आहेत. पक्षाची गरज कधीच संपत नाही. काही मतदारसंघ असे आहेत तिथे आम्ही अजुनही पोहोचलेले नाही. त्यामुळे तिथेही पोहोचायला मिळाले तर चांगलच आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

" आमची राज ठाकरेंसोबत निवडणुकी संदर्भात चर्चा झालेली नाही. आम्ही त्यांना भेटतो, आमचे आणि त्यांचे विचार सारखेच आहेत. विचारांचे आदान-प्रदान होतं, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  

काँग्रेस- राष्ट्रवादीचे किती आमदार संपर्कात आहेत?

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीअगोदर राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे. 

Ajit Pawar: अजितदादा भाजपमध्ये जाणार का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आपल्या आत्मविश्वासामुळे अनेकजण संपर्कात आहेत. गेल्या पाच वर्षात अनेकजण आमच्याकडे आले. संपर्काच नात्यामध्ये परिवर्तन निवडणुकीवेळी होतं.   

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनाभाजपा