Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार, मंत्र्यांसह नियोजित अयोध्या दौऱ्यासाठी शनिवारी विशेष विमानाने लखनौमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे लखनौ विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. दरम्यान, या दौऱ्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या दौऱ्याला शिवसेनेतील काही आमदार गेलेले नाहीत. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील काहीव आमदार नाराज असल्याचा दावा केला आहे. मंत्री अब्दुल सत्तारही अयोध्येत गेलेले नाहीत. यामुळे तेही नाराज असल्याच्या चर्चा सुरूहोत्या. यावर आता मंत्री सत्तार यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे.
Thackeray Group Vs Shinde Group: ठाकरे गटाला मोठा धक्का! सेना भवन, शाखा, पक्षाचा निधी शिंदे गटाला द्या; सुप्रीम कोर्टात याचिका मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी नाराज असतो तर इथेही आलो नसतो. रामाच्या बाबतील माझ्या मनात शंका नाही माझ्या, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यामुळे मी दौरा सुरू केला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभं आहे याची मी ग्वाही देतो अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
गेल्या दोन दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी दौरा सुरू केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पंचनामे होती, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे, शिंदे सरकारने आतापर्यंत सर्वात मोठी मदत शेतकऱ्यांना केली आहे, असंही मंत्री सत्तार म्हणाले.