19 Jul, 21 08:58 PM
अति मुसळधार पावसाने कल्याण स्टेशनमध्ये पाणी भरले. डोंबिवली हून टिटवाल्यासाठी विशेष लोकल
19 Jul, 21 07:04 PM
खाेपाेली क्रांतीनगर येथील दाेन लहान मुले वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे.
19 Jul, 21 07:03 PM
मुंबई-गोवा हायवेवर बाळगंगा नदीचे पाणी, ST पाण्यातून मार्ग काढत निघाली....
19 Jul, 21 06:52 PM
पार्किंगमधील 400 वाहनांचे झाले मोठे नुकसान
पालिकेच्या वाहन पार्किंग मध्ये वाहने सुरक्षित राहण्यासाठी वाहनचालक आपली वाहने ठेवतात.मात्र दि,17 जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात वेगाने पाण्याचा लोंढा कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स येथील पालिकेच्या पार्किंग लॉट मधील 400 वाहनांचे झाले मोठे नुकसान झाले आहे.
19 Jul, 21 05:45 PM
दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू
कळवा येथील घोलाई नगर परिसरात तीन घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला . तर दोघांना वाचविण्यात टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
19 Jul, 21 05:07 PM
मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाकडून रेड अलर्ट
19 Jul, 21 04:41 PM
हे चित्र आहे खार दांडा कोळीवाडा गावातील, पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी
खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या खारदांडा कोळीवाड्यातील रहिवाशांनी खड्ड्यांना फुले वाहून प्रशासनाचे धन्यवाद मानले. तसेच येथील रस्ते व्यवस्थित करावे यासाठी विठ्ठलाकड़े गाऱ्हाणे घातले.
19 Jul, 21 03:50 PM
नेरळ-माथेरान घाटामध्ये वाटरपाईपच्यावरील वळणामध्ये दरड कोसळली
नेरळ माथेरान घाटामध्ये वाटरपाईपच्यावरील वळणामध्ये दरड कोसळली असून सध्या रस्ता बंद आहे.
19 Jul, 21 03:45 PM
अरे संसार संसार... चेम्बुरमध्ये पावसाने घर पडले, उघड्यावर आला गरिबाचा संसार
19 Jul, 21 02:56 PM
ठाणे स्लो लाईनचा पहिला व दुसरा ट्रँक पाण्याखाली
ठाणे स्टेशन परिसरातील स्लो लाईनचा पहिला व दुसरा ट्रँक पाण्याखाली गेला आहे. नुकतीच ५ मिनीट आधी एक स्लो लोकल मुंबईकडे धावल्याचे प्रत्यक्षदर्शी सुरेश लोखंडे यांनी सांगितले
19 Jul, 21 02:49 PM
मुबईत धोकादायक विदारक चित्र - आशिष शेलार
19 Jul, 21 02:36 PM
रस्ता पाण्याखाली, खड्डे दिसत नसल्यानं रहिवाशांचे हाल
19 Jul, 21 12:31 PM
गडनदीला पूर; मसुरे सह बांदिवडे गावचा संपर्क तुटला
मालवणमध्ये धो धो बरसणाऱ्या पावसाने रविवारी सायंकाळ नंतर गडनदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडनदी पात्रातील खोत जुवा, मसुरकर जुवा या बेटावरील ग्रामस्थांच्या घरा सभोवताली पुराचे पाणी आल्याने ग्रामस्थांनी जीव मुठीत घेऊन रात्र काढली. बेटावरील अनिल खोत यांच्या रिसॉर्टचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे तर पराग खोत यांच्या घराच्या पडवीत पाण्याने प्रवेश केला आहे.
19 Jul, 21 02:07 PM
चेंबूरच्या उमरशी बाप्पा चौक येथे रास्ता रोको आंदोलन
मुंबईतील पावसामुळे चेंबूरच्या BARC येथील संरक्षक भिंत तर विक्रोळी येथे दरड कोसळून 30 लोकांना जीव गमवावा लागला आहे. हजारो लोकांच्या घराची पडझड होऊन त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या या गलथानपणाचा जाब विचारण्यासाठी, संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, सर्व दुर्घटनाग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करा, या मागणीकरिता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने चेंबूरच्या उमरशी बाप्पा चौक येथे रास्ता रोको आंदोलन.
19 Jul, 21 02:01 PM
नाल्यात केमीकल सोडल्याने नाल्याचा प्रवाह हिरवा
कल्याण- डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न भर पावसात पुन्हा चर्चेत आला आहे. डोंबिवलीतील एका कंपनीने मुसळधार पावसाचा फायदा घेत चक्क नाल्यात केमीकल सोडल्याने नाल्याचा प्रवाह हिरवा झाला.या प्रकरणाची कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. एमआयडीने या कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.
19 Jul, 21 02:00 PM
ठाणे : मुंब्रा स्टेशन मधील ट्रॅकवरती पाणी
19 Jul, 21 12:48 PM
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात 3 फूट पाणी
48 तासात पासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीला पूर आला असून या वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभार्यात देखील पाणी शिरले आहे. त्यामुळे गाभाऱ्यातील शिवलिंग देखील पाण्याखाली आले आहेत.
19 Jul, 21 01:48 PM
अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात शिरले पाणी; पालिकेचे कामकाज ठप्प
मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यातच अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयत देखील पाणी आल्याने कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. काही कार्यालयांमध्ये महत्वाच्या फाईल देखील भिजल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, तर भंडार विभागातील अनेक सामान पाण्याखाली आले आहे. सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरील नाला भरून वाहत होता.
19 Jul, 21 01:31 PM
मुंब्र्यात शिरलेल्या पाण्यात १५ बकऱ्या बुडाल्या
शहरात पावसाचे बरसणे सुरूच असल्याने ठाणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात ही पाणी शिरले. त्यातच मुंब्र्यात दोस्ती आणि नाइस पार्क जवळील परिसरात काही बैठे गाळे आहेत. या गाळ्यात कुर्बानीसाठी एका व्यापाऱ्याने तब्बल २९ बकरे आणले होते. त्या बकऱ्यांचा रविवारी व्यवहारही झाला होता आणि सोमवारी बकरे नेण्यासाठी लोक येणार होते. त्यातच रात्री अचानक पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात झाली हे तीन ते चार फुटांवर गेले होते. दरम्यान या पाण्यात एक गाडी वाहून ही गेली. पाणी वाढल्याने गाळ्यात ठेवलेल्या हलविण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांमार्फत सुरू होता. पण शिरलेल्या पाण्यात १५ बकऱ्या बुडाल्या आणि त्या मेल्या आहेत. तर १४ बकऱ्यांना वाचविण्यात यश आले आहे
19 Jul, 21 01:29 PM
कसारा येथील शिवाजीनगरमध्ये दोन कच्ची घरे पडली
ठाणे : कसारा येथील शिवाजीनगरमध्ये दोन कच्ची घरे पडली आहेत.तेथील लोकांना जवळच्या जिल्हापरिषद शाळेत स्थलांतरित केले आहे. सुदैवाने जीवित हानी नाही.
19 Jul, 21 01:25 PM
ठाण्यातील मुसळधार पावसामुळे तलाव पाळी 'ओव्हरफ्लो'
19 Jul, 21 01:11 PM
श्रीवर्धन-दिघी मार्गावर रस्ता खचला, भूस्खलनाचं थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद...
19 Jul, 21 01:02 PM
पाताळगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, पेणमध्येही पूरस्थिती
पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे जोहे-पेणमध्येही पूर परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथील गणपती बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये पाणी शिरलंय.
19 Jul, 21 12:52 PM
पावसात कर्तव्य बजावताना पोलीस शिपाई
नागोठणे एस. टी. स्टँड व नागोठणे कोळीवाडा परिसरात येथील अंबा नदीचे पाणी आले आहे तसेच नागोठणे ते पोयनाड रोडवरील कुहिरे गावाजवळ रोडवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. तेथे पावसात पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत.
19 Jul, 21 12:39 PM
मासुंदा तलाव ओव्हर फ्लो ; ठाणेकरांनी लुटला मासेमारीचा आनंद
सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलावही सोमवारी सकाळी ओव्हर फ्लो झाला. त्यातच ठाण्याची मुख्य बाजारपेठेत ही पाणी तुंबल्याने तेथील पाणीही रस्त्यावर आले. तलावातील पाणी बाहेर येत असल्याने त्या पाण्याबरोबर तलावातील काही मासे ही बाहेर आले होते. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी मासेमारीचा आनंद लुटला.
19 Jul, 21 12:34 PM
कसारा रेल्वेसह महामार्गावर दरड कोसळली
दोन दिवस सतत् कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री ११ वाजता मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. रात्री ११ ते १ या वेळात भर पावसात पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी नाशिककडे जाणारी वाहतूक विशेषतः लहान वाहनांची वाहतूक बॅटर्या, च्या साहाय्याने एका लेन ने संथ गतीने सुरु ठेवली
19 Jul, 21 12:29 PM