कोकणासह विदर्भाला ऑरेंज अलर्ट; कोणत्या जिल्ह्यांत विजा कडाडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 08:00 AM2022-07-03T08:00:21+5:302022-07-03T08:00:36+5:30
४ आणि ५ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
मुंबई : सर्वसाधारण आठ जुलैच्या आसपास संपूर्ण देश व्यापणाऱ्या मान्सूनने यावर्षी वेळेपूर्वीच म्हणजे २ जुलैला देश व्यापला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोसळणारा मान्सून येत्या ४८ तासांत कोकण आणि अंतर्गत भागात सक्रिय राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तर दुसरीकडे कोकणासह विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोकण आणि अंतर्गत भागात मान्सून सक्रिय राहील. सोमवारपासून कोकण, राज्याच्या अंतर्गत भागात आणि विदर्भाच्या काही भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. - कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग
ऑरेंज अलर्ट
४ जुलै रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.
५ जुलै रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.
६ जुलै रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
यलो अलर्ट
३ जुलै ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
४ आणि ५ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
६ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर.
कोणत्या जिल्ह्यांत विजा कडाडणार ?
३ जुलै : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.