Join us

चिंताजनक! राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११ हजार १४१ कोरोना रुग्ण वाढले; ३८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 11:04 PM

Maharashtra Corona Cases Today: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा गेल्या काही दिवसांपासून काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय.

Maharashtra Corona Cases: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा गेल्या काही दिवसांपासून काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. आज राज्यात तब्बल ११ हजार १४१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ६ हजार १३ रुग्ण बरे झाले आहेत. तर दुर्दैवानं ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra Corona 11,141 New Cases In Last 24 Hours)

राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत राज्यात ५२ हजार ४७८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सध्या ९८ हजार ९८३ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. 

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे चिंता वाढवणारे आहेत. दिवसागणिक रुग्णांमध्ये दहा हजारांनी वाढ होत असल्यानं प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. 

मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमध्येही कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस