Coronavirus: राज्यात गेल्या २४ तासांत २,३४३ रुग्ण कोरोनामुक्त; ३५ जणांचा मृत्यू, रिकव्हरी रेट ९७.३८ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 08:00 PM2021-10-14T20:00:07+5:302021-10-14T20:02:37+5:30

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.

maharashtra reports 2384 new corona cases and 35 deaths in last 24 hours | Coronavirus: राज्यात गेल्या २४ तासांत २,३४३ रुग्ण कोरोनामुक्त; ३५ जणांचा मृत्यू, रिकव्हरी रेट ९७.३८ टक्के

Coronavirus: राज्यात गेल्या २४ तासांत २,३४३ रुग्ण कोरोनामुक्त; ३५ जणांचा मृत्यू, रिकव्हरी रेट ९७.३८ टक्के

Next
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ३८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद२ हजार ३४३ रुग्ण कोरोनामुक्तमुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ११५१ दिवसांवर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २ हजार ३४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.३८ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २ हजार ३८४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 2384 new corona cases and 35 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ३८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ३५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २ हजार ३४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख १३ हजार ४१८ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण २९ हजार ५६० इतकी आहे. 

मुंबईकरांना काहीसा दिलासा

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५४६ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ३३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाचे ५ हजार ३१७ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के इतका आहे. मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ११५१ दिवसांवर गेला आहे. 

दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ०६ लाख ८३ हजार ५२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ८६ हजार २८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख २६ हजार २४९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १ हजार ०७० जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 
 

Web Title: maharashtra reports 2384 new corona cases and 35 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.