CoronaVirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत ५६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ४९८ रुग्णांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 11:31 PM2021-12-13T23:31:58+5:302021-12-13T23:42:40+5:30
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९३ हजार ००२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत ५६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ४९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९३ हजार ००२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के आहे. राज्यात आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ६ हजार ५०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात ७४ हजार १९० व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
COVID-19 | Maharashtra reports 569 new cases, 498 recoveries and 5 deaths today. Active cases 6,507
— ANI (@ANI) December 13, 2021
Two new Omicron cases reported- 1 from Latur, 1 from Pune, as per a report released today by National Institute of Virology; total 20 Omicron cases in the State pic.twitter.com/841n97gWo2
संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दोन ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी एक रुग्ण पुणे आणि एक रुग्ण लातूरमधील आहे. आतापर्यंत २० ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ९ जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झालेल्या जगभरातील पहिल्या रुग्णाची नोंद आता झाली आहे. बोरिस जॉन्सन म्हणाले की, दररोज ओमायक्रॉनची लागण झालेल्या शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. त्यातच आज कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे ३० पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.