CoronaVirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 11:48 PM2021-12-14T23:48:29+5:302021-12-14T23:49:24+5:30
राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 481 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबई: राज्यभरात गेल्या 24 तासांत राज्यात आज 684 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 93 हजार 688 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे, अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 481 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 492 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,70,63,688 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
Maharashtra reports 684 new #COVID19 cases, 686 recoveries and 24 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) December 14, 2021
Total cases 66,45,136
Total recoveries 64,93,688
Death toll 1,41,288
Active cases 6481 pic.twitter.com/zweFKeavbV
राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज नव्या 8 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी 7 रुग्ण मुंबई आणि एक रुग्ण वसई-विरारमधील आहे. त्यामुळे एकूण 28 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यामधील 9 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबत सोमवारी माहिती दिली आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झालेल्या जगभरातील पहिल्या रुग्णाची नोंद आता झाली आहे. बोरिस जॉन्सन म्हणाले की, दररोज ओमायक्रॉनची लागण झालेल्या शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. त्यातच आज कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे 30 पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.