CoronaVirus News: गेल्या २४ तासांत राज्यात ९२५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९२९ जणांनी कोरोनावर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:46 PM2021-12-16T23:46:18+5:302021-12-16T23:53:27+5:30
राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई: राज्यभरात गेल्या 24 तासांत राज्यात आज 877 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 632 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 95 हजार 249 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.
राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 693 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 77 हजार 371 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 839 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,73, 06,860 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 25 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रानचे 87 रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात तेलंगानामध्ये 4 आणि कर्नाटकमध्ये 5 नवे रुग्ण सापडल्याने वेग वाढू लागला आहे.
दरम्यान, जगातील 60 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट पोहोचला आहे. कोरोना ओमायक्रॉनने भारताचे टेन्शन वाढविले आहे. आधीच रुग्ण वाढत असताना देशावर आता कम्युनिटी स्प्रेडची टांगती तलवार लटकू लागली आहे. डब्ल्यूएचओने ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही वेगाने पसरणार असल्याने हॉस्पिटलनी तयार रहावे असा इशारा नुकताच दिला आहे.