मला कसं अडवू शकता, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 08:54 PM2023-05-01T20:54:57+5:302023-05-01T20:55:29+5:30

मुंबईत आयोजित वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकेचा बाण सोडला.

maharashtra shiv sena uddhav thackeray targets government over barsu refinery konkan vajramuth rally mumbai | मला कसं अडवू शकता, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे कडाडले

मला कसं अडवू शकता, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे कडाडले

googlenewsNext

कर्नाटकाची निवडणूक सध्या रंगात आली आहे. पंतप्रधान म्हणाले ९१ वेळा शिव्या दिल्या म्हणाले. शिव्या मोजणारी सभ्य माणसं आहेत. मी शिव्यांचं समर्थन करत नाही. तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस शिव्या देते, तर मला, आदित्यला, माझ्या कुटुंबीयांना रोज जे बोलतायत त्याच्याबद्दल तुम्ही गप्प का? माझ्याबद्दल ज्या भाषेत बोलले, त्याबद्दल माझा शिवसैनिक अजून गप्प आहे. तुमची लोकं बोलल्यावर आमची लोकंही बोलणारच, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता ही वज्रमूठ झालीये. याचा हिसका तुम्ही पाहिला आहात. विधान परिषद, बाजार समिती निवडणुकांमध्ये आम्ही सर्वांना चारीमुंड्याचित केलंय, असंही ते म्हणाले. मुंबईतील आयोजित वज्रमूठ सभेत त्यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला.

सध्या महाराष्ट्रात बारसूचा विषय भडकेलेला आहे. सहा तारखेला बारसूला जाऊन लोकांना भेटून बोलणार. कसं मला अडवू शकता, तो पाकव्याक्त काश्मीर नाही, बांगलादेश नाही, माझ्या महाराष्ट्रातील रत्नागिरीतील तो भाग आहे. सहा तारखेला आधी मी बारसूला जाणार आणि नंतर महाडच्या सभेला जाणार. तिकडे माझ्या नावाचं पत्र दाखवलं जातं. हो आम्हीच ही जागा सूचवली होती. त्या पत्रात पोलिसांना घुसवा, अश्रूधूर सोडा, वेळेप्रसंगी गोळ्या चालवा पण रिफायनसी करा असं लिहिलंय का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

“आज तिन्ही पक्ष एकत्र आहेत. जेव्हा मविआचं सरकार होतं तेव्हा मी पवारांच्या अंमलाखाली गेलो, राष्ट्रवादी दादागिरी करतेय अशी बोंब मारत होते. पण आज उदय सामंत पवारांना भेटले. तुम्ही गेला तर चालतं? पण उद्धव ठाकरेंनी करायचं नाही. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेव्हा यांचा पत्ता नव्हता ते शेफारलेली लोकं मला आज बाळासाहेब शिकवतायत. त्यांना आज सांगायचंय अनेक जण बाळासाहेबांना भेटलाही नव्हता. पण स्वत: शरद पवारांकडे सल्ला मागायला जाता. जर बारसू बारसू करत असाल, तर पालघरमध्ये आदिवसींच्या घरात पोलीस का घुसवले?” असा सवालही त्यांनी केला.

जमीन बुलेट ट्रेनच्या घशात घातली...
“सभा या मैदानात आहे माहित नव्हतं. आधी बाजूच्या मैदानात सभा व्हायची. आपलं सरकार गेलं आणि त्यानंतर मुंबईची सोन्यासारखी जमीन या सरकारनं बुलेट ट्रेनच्या घशात टाकली. हे पत्रही मी दिलं होतं? यासाठी किती खोके घेतले असतील माहित नाही. मुंबईतील बीकेसीची जागा, कोरोना सेंटर उभारलं होतं, सरकार बदलल्यावर पहिलं काम केलं ती म्हणजे सोन्यासारखी जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“२०१४ मध्ये त्यांनी सांगितलं होतं अच्छे दिन आएंगे. आले का अच्छे दिन. हजारो कोटी लोकांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या, पण मिळाल्या का? मी सत्तेत आलो, खूर्चीवर बसलो, जातीय दंगली पेटवायच्या, तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करायचा. त्यात एवढे व्यग्र होता, मग जाऊद्या नोकरी वगैरे आपलं घर आहे. लढायचं रक्त सांडायचं, त्यावरून राजकारण करायचं. पुन्हा निवडणुका आल्या की पुन्हा काही थाप मारायची आणि निवडून यायचं यात तुम्हाला देशाची बरबादी होतेय हे समजत नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

...तरच प्रकल्प होईल हे सरकारचं धोरण होतं
बासरूमध्ये अंतिम लोकांची मान्यता मिळाली तरच प्रकल्प होईल हे सरकारचं धोरण होतं. हे उलट्या पायाचं आणि उलट्या काळजाचं सरकार आहे. मदतीसाठी गेल्यावर मदत जाहीर खूप झाली. मिळालं काहीच नाही. मी मागणी करतो कोकणात आंब्याचे नुकसान झाले ते मविआ ने भरपाई दिली तशी द्या, असंही ते म्हणाले.

Web Title: maharashtra shiv sena uddhav thackeray targets government over barsu refinery konkan vajramuth rally mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.