Join us

Maharashtra Board SSC and HSC Exam Time Table : मोठी बातमी! इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 9:07 PM

Maharashtra Board Exam Time Table and Result Date 2021 MSBSHSE : इयत्ता १० वी (SSC Exam) आणि इयत्ता १२ वी (HSC Exam) परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर

Maharashtra HSC and SSC Board Exam Time Table 2021: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा होणार की नाही अशी शंका निर्माण झाली असतानाच शिक्षण विभागानं अखेर आज वेळापत्रक जाहीर केलं आहे. संभाव्य वेळापत्रकासाठी २२ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या सर्व सुचनांचा विचार करुन अखेर इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

कोविड-१९ च्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करुनच परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. 

१० वीची परीक्षा केव्हा? (SSC Exam Schedule)इयत्ता १० वीची (SSC Exam) लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार आहे, असं राज्याच्या शिक्षण मंडळानं जाहीर केलं आहे. 

१२ वीची परीक्षा केव्हा? (HSC Exam Schedule)इयत्ता १२ वीची (HSC Exam) लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात. 

टॅग्स :12वी परीक्षादहावीशिक्षणमहाराष्ट्र