Join us

Mumbai Guidelines : मुंबईतील सर्व दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू, लोकल प्रवासामध्ये शिथिलता नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 10:18 PM

Mumbai Guidelines : मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे. तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात मंगळवरपासून शिथिलता आणण्यात आली आहे

ठळक मुद्देमुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे. तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात मंगळवरपासून शिथिलता आणण्यात आली आहे.

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे मुंबईत ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व दुकान व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र लोकल सेवा सुरू होण्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी सुधारित परिपत्रक जारी केले.

मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे. तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात मंगळवरपासून शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र लोकल सेवा, खासगी कार्यालये, मॉल, चित्रपटगृह यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. सध्या चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असलेल्या दुकानांच्या वेळेमध्ये वाढ करून देण्याची मागणी मंजूर करण्यात आली आहे.

काय सुरू राहणार...

* सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे. मात्र वैद्यकीय दुकाने आठवड्यातील सर्व दिवस २४ तास सुरू ठेवू शकतात.* सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आठवड्याचे सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल.* जलतरण तलाव आणि निकटचा संपर्क येऊ शकतो, असे क्रीडाप्रकार वगळून इनडोअर आणि आऊटडोअर  खेळासाठी सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असणार आहे.* चित्रकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी असेल. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रलॉकडाऊन अनलॉकलोकल