Vidhan Sabha 2019 : बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा बंद; मात्र सरकारची जाहिरातबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 04:16 AM2019-09-18T04:16:15+5:302019-09-18T04:16:55+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करुन जनतेची दिशाभूल केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 -Bike ambulance service down; But government advertising | Vidhan Sabha 2019 : बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा बंद; मात्र सरकारची जाहिरातबाजी

Vidhan Sabha 2019 : बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा बंद; मात्र सरकारची जाहिरातबाजी

googlenewsNext

मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करुन जनतेची दिशाभूल केली आहे. बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा बंद असताना सरकार त्याची जाहिरातबाजी करत असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आॅगस्ट २०१७ रोजी मुंबईत १० बाईक अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरु केली होती. नंतर मेळघाट, पालघर, गडचिरोली या दुर्गम भागातही सेवेचा विस्तार करण्यात आला. पण सरकारचा कालावधी संपत आला तरीही सेवा सुरु झालेली नाही. पालघर, मेळघाटमध्ये १० बाईक्सच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेली सेवा तर वर्षभरातच कर्मचारी वर्ग नसल्यामुळे बंद करण्याची नामुष्की ओढवली असल्याची माहिती आहे, परंतु आरोग्य विभागाला त्याचा पत्ताच नाही. २०१४ पासून ही सेवा सुरू झाली, हे कशाच्या आधारावर सांगितले, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 -Bike ambulance service down; But government advertising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.