Join us  

Vidhan Sabha 2019: मागाठाण्यात सेना भाजपच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:09 PM

मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कल्पना लढविल्या जात आहेत.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर केल्यानंतर इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कल्पना लढविल्या जात आहेत. कुठे कार्यकर्ता मेळावा आयोजन होत आहे तर कुठे सण उत्सवांच्या निमित्ताने इतर भाषिक समाजालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियाचा वापरही या वेळी उमेदवार जोमाने करत आहेत.सध्या शिवसेनेचे ठाणे असलेल्या मागाठाणे या उत्तर मुंबईच्या मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांचे वर्चस्व आहे. मात्र प्रकाश सुर्वे यांना लढा देण्यासाठी राष्ट्रवादी मोचेर्बांधणी करत असून सोमवारी त्यांनी मागाठाणे तालुक्याच्या वतीने निवडणूक तयारी करण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन कांदिवली येथे केले होते. या वेळी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मार्गदर्शन केले. २०१४ साली राष्ट्रवादीकडून सचिन शिंदे यांना २६९७ मतावर समाधान मानावे लागले होते. यंदा राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.मागाठाणे मतदारसंघ हा मराठीबहुल असून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे. मात्र सध्या मराठी मतांसोबतच इतर भाषिक मतदारांकडे ते पूर्ण लक्ष देत आहेत. उत्तर भारतीय समाजातील स्त्रियांचा जीवितीया उपवासाचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. या सोहळ्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यांनी उत्तर भारतीय समाजातील;सर्व स्त्रियांना निशुल्क प्रवेश दिला.भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडूनही मतदारसंघात मोचेर्बांधणी सुरु असून मागाठाण्यातील मुख्य सत्तासंघर्ष भाजपा आणि शिवसेनेतच असून युती होणार की नाही यावर या सत्तासंघषार्ची मोठी भिस्त असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगत आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाभाजपा