Vidhan Sabha 2019: मंत्री विनोद तावडेंचा पत्ता कट? 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 10:56 AM2019-10-03T10:56:19+5:302019-10-03T10:59:18+5:30

विनोद तावडेंना उमेदवार मिळण्याची शक्यता कमी

Maharashtra Vidhan Sabha 2019 bjp may not give candidature to vinod tawde | Vidhan Sabha 2019: मंत्री विनोद तावडेंचा पत्ता कट? 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत

Vidhan Sabha 2019: मंत्री विनोद तावडेंचा पत्ता कट? 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई: राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तावडेंच्या जागी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उत्तर मुंबई भाजपा अध्यक्ष विनोद शेलार किंवा बोरिवलीचेभाजपा नगरसेवक प्रवीण शाह यांची नावे चर्चेत आहेत अशी विश्वसनीय माहिती आहे.

भाजपाने पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम व बोरिवली विधानसभेचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मालाड पश्चिमेतून प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉ. श्याम अगरवाल व बोरिवलीतून विनोद शेलार यांना उमेदवारी मिळू शकते अशीदेखील चर्चा आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत तसेच काल रात्री जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतही विनोद तावडे यांचे नाव नव्हते. त्यामुळे तावडे यांचे काय होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात व मुंबईत सुरू आहे.

तावडे यांच्या कार्यपद्धतीवर पक्षश्रेष्ठींमध्ये नाराजी होती. काल सकाळी तिकीटाबद्धल तावडे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे तावडे निघून गेले. मग त्यांच्या समर्थकांनी पाटील यांच्या बंगल्यासमोर त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. त्यामुळे विनोद तावडे यांना विधानसभेचे तिकीट मिळणार का? त्यांचा मतदार संघ बदलणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 bjp may not give candidature to vinod tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.