Join us

Vidhan Sabha 2019: सेनेच्या गडावर भाजपची लगबग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 2:27 AM

लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या उमेदवारांची शिवसेनेचे गड मानल्या जाणाऱ्या ठिकाणीही लगबग

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या उमेदवारांची शिवसेनेचे गड मानल्या जाणाऱ्या ठिकाणीही लगबग कायम असल्याचे चित्र भांडुप, विक्रोळी विधानसभामध्ये आहे. यात, इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.सध्या भांडुपमध्ये सेनेचे ४, भाजपचे २ आणि कॉंग्रेसचे १ बलाबल आहे. त्यातही, सेना-भाजप वेगळे लढले किंवा जागांची अदलाबदल झाली, या आशेवर भाजपकडून दिपक दळवी, जितू घाडीगावकर, कौशीक पाटील, मंगेश पवार हे इच्छुक आहेत. त्यामुळे सेना - भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मनसेकडून संदीप जळगावकर आणि माजी नगरसेविका अनिषा माजगावकर रिंगणात उतरु शकतात. आघाडीसोबत मनसे गेली तरीही, मनसे ही जागा मागू शकते. काँग्रेसकडून नगरसेवक सुरेश कोपरकर यांना संधी दिली जाऊ शकते. वंचितच्या उमेदवाराचा चेहरा अद्याप अस्पष्ट आहे. तर, विक्रोळीतून सेनेमधून सुनील राऊतांचेच नाव चर्चेत आहे.उमेदवार होतोय टेक्नोसॅव्ही...कमी दिवसात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार सोशल मिडीयाचा आधार घेताना दिसत आहे.माध्यमावरून पोस्ट, फोटो शेअर करत केलेल्या कामाबाबत सांगत आहे. काही उमेदवार तर ’समस्या लेकर आईये.. समाधान पाईये’ सारख्या पोस्ट व्हायरल करुन लागले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपाशिवसेना