Vidhan Sabha 2019: सेनेला वरळीतील यशाची खात्री; युवराजांसाठी मोर्चेबांधणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 01:01 AM2019-09-27T01:01:39+5:302019-09-27T01:03:41+5:30

शिवसेनेचा गड असलेल्या वरळीमधून २००९ ची विधानसभा निवडणूक सोडली तर सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 Cena confirms success in Worli | Vidhan Sabha 2019: सेनेला वरळीतील यशाची खात्री; युवराजांसाठी मोर्चेबांधणी सुरू

Vidhan Sabha 2019: सेनेला वरळीतील यशाची खात्री; युवराजांसाठी मोर्चेबांधणी सुरू

Next

मुंबई : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी वरळी विधानसभा हा मतदारसंघ आहे. शिवसेनेचा गड असलेल्या वरळीमधून २००९ ची विधानसभा निवडणूक सोडली तर सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुुरू आहे. या मतदारसंघात सेनेच्या मतांची टक्केवारीही जास्त असल्याने यशाची खात्री आहे.

ठाकरे कुटुंबीयांतील कोणी आजवर निवडणूक लढविली नसली तरी आदित्य ठाकरे मात्र निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. आदित्य यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची चाचपणी सुरू केल्याने वरळी मतदारसंघ विशेष चर्चेत आला आहे. आदित्य येथून लढणार असतील तर त्यांना कोणताही धोका ठरू नये यासाठीच सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. विशेष म्हणजे आदित्य यांनीच अहिर यांच्यासाठी मध्यस्थी केली.

या मतदारसंघातून शिवसेनेकडून सध्याचे आमदार सुनील शिंदे किंवा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणीही निवडणूक लढवली तरी विजय शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास येथील शिवसेना पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
२००९ मध्ये कुख्यात गुंड आणि माजी आमदार अरुण गवळी यांचे भाचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी ५२ हजार ३९८ मते मिळवत शिवसेनेच्या आशिष चेंबूरकर यांना पराभूत केले. चेंबूरकर यांना ४७ हजार मते मिळाली होती. २००९ च्या विधानसभेतील यशानंतर अहिर यांनी वरळी मतदारसंघात चांगलीच लोकप्रियता मिळविली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत येथून ते पुन्हा निवडून येतील, अशी हमखास खात्री शरद पवार यांनाही होती. मात्र, शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी अहिर यांच्यापेक्षा दुपटीने मते घेत त्यांचा पराभव केला.

सेनेच्या उमेदवाराला हरविले
२००९ मध्ये कुख्यात गुंड आणि माजी आमदार अरुण गवळी यांचे भाचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी ५२ हजार ३९८ मते मिळवत शिवसेनेच्या आशिष चेंबूरकर यांना पराभूत केले. चेंबूरकर यांना ४७ हजार मते मिळाली होती.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Cena confirms success in Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.