Join us

Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 12:00 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : राज्यात बहुमत नसतानाही स्थिर सरकार चालविल्याबद्दल पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं होतं. तसेच आगामी काळात फडणवीस सरकारला पूर्ण बहुमत द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं.

मुंबई - मागील 5 वर्षात मंत्रिमंडळात जे निर्णय घेतले ते एकीने घेतले आहे. एकही निर्णय नाही ज्यात शिवसेनेच्या मंत्र्यांनी विरोध केला आहे. कॅबिनेटच्या अजेंड्यावर विषय घेतला आणि त्याला शिवसेनेच्या मंत्र्यांनी विरोध केला असं एकही उदाहरण नाही, बाहेर काहीही वक्तव्य केली तरी त्याचा फरक पडत नाही असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

राज्यात बहुमत नसतानाही स्थिर सरकार चालविल्याबद्दल पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं होतं. तसेच आगामी काळात फडणवीस सरकारला पूर्ण बहुमत द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. त्यावरुन युतीबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं. तसेच राजकारणात A to Z प्लॅन तयार असतात. पंतप्रधान भाजपाच्या महाजनादेश यात्रेत आले ते युतीच्या व्यासपीठावर आले नव्हते. महायुतीचा झेंडा विधानसभेवर लावणार हे मी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री म्हणून मीच असेन या साशंकता नाही असंही त्यांनी सांगितले आहे. 

शिवसेनेसोबत निवडणुका लढणार हे स्पष्ट आहे. जागावाटपावर चर्चा सुरु आहे, बातम्यांमधील आकड्यांवर विश्वास ठेऊ नये. पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचे आकडेवारी जाहीर करु. शिवसेना आम्ही मित्रपक्ष, एकमेकांसोबत बसून निर्णय घेऊ. जेव्हा आम्ही कमकुवत होतो तेव्हाही शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून दोन्ही पक्ष प्रयत्न करत असतात असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवसेनेने सामनातून पाच वर्षात मोदींवर आणि सरकारवर टीका केली त्यावर   मी सामना वाचत नाही, त्यामुळे ते काय लिहितात याची माहिती नाही असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यावं हे शिवसेनेने ठरवावं

मुख्यमंत्री कोणाचा असेल याबाबत महाराष्ट्राच्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात शंका नाही, आदित्य ठाकरे चांगल्या पद्धतीने राजकारणात सक्रीय होत आहे. नवीन पिढीला वाटत असेल सक्रीय राजकारणात यावं तर ठाकरे घराण्याची परंपरा बदलू शकते. आदित्य ठाकरेंचे राजकारणात येणं मी सकारात्मक दृष्टीने बघतो, मी स्वागत करतो. उपमुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं हे शिवसेनेने ठरवावं असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद माझ्यासाठी राखीव असल्याचं टोला शिवसेनेला लगावला.   

महत्वाच्या बातम्या 

'हीच माझी इच्छा... महाराष्ट्रानं मला भरभरुन दिलं', पवारांचं भावनिक ट्विट

'शरद पवारांचे राजकारण संपले आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली'

कसं काय...बरं हाय ना! भाजपाचा 'रम्या' देणार विरोधकांना प्रेमाचे डोस; कोण आहे तो?

युती झाल्यास मोठी बंडखोरी, काँग्रेस, वंचितसह राष्ट्रवादीही पंचंड आशावादी

Exclusive : ... म्हणून राज ठाकरे आघाडीत नाहीत, पवारांचं लोकमतला 'मनसे' उत्तर 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनादेवेंद्र फडणवीसविधानसभा निवडणूक 2019