Vidhan Sabha 2019 : मुंबई महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवकही निवडणुकीच्या रिंगणात..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:49 AM2019-10-02T03:49:37+5:302019-10-02T03:49:54+5:30

आगामी विधान सभेच्या निवडणुकीत अनेक इच्छुक नगरसेवकांना आपले नशीब आजमाविण्याची संधी मिळाली आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019: Ex-corporator of Mumbai Municipal Corporation is also in the fray for election .. | Vidhan Sabha 2019 : मुंबई महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवकही निवडणुकीच्या रिंगणात..

Vidhan Sabha 2019 : मुंबई महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवकही निवडणुकीच्या रिंगणात..

Next

मुंबई : आगामी विधान सभेच्या निवडणुकीत अनेक इच्छुक नगरसेवकांना आपले नशीब आजमाविण्याची संधी मिळाली आहे. तर गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या काही ज्येष्ठ नगरसेवकांचे स्वप्न यंदाही भंगले आहे. आरक्षणामुळे घरी बसावे लागलेल्या काही
माजी नगरसेवकांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
नगरसेवकपद ही राजकारणातील पहिली पायरी म्हणून ओळखली जाते. दोन-तीनवेळा नगरसेवकपदावर निवडून आल्यानंतर उमेदवारांना आमदारकीचे वेध लागतात. मात्र यातही पक्षात ह्यवजनह्ण असलेल्यांना नगरसेवक पदाच्या पहिल्याचं टर्ममध्ये आमदारकी व खासदारकीची लॉटरी लागल्याचेही दिसून आले आहे. तर गेले २०-२५ वर्षे नगरसेवकपद भूषविणाऱ्या ज्येष्ठ नगरसेवकांचा प्रत्येक विधान सभा निवडणुकीत भ्रमनिरास होत आहे.
यावेळेसही इच्छुक नगरसेवकांची यादी मोठी होती. यावेळेस तरी आमदारकीची लॉटरी लागावी, यासाठी ज्येष्ठ नगरसेवकांनी मोर्चेबांधणी केली होती. काही ज्येष्ठ नगरसेवकांनी आपल्याला तिकिट मिळणारचं या खात्रीने मतदारसंघात जोर लावला होता. मात्र शिवसेना-भाजप युतीमुळे काहींचे पत्ते कट झाले आहेत. आगामी विधान सभा निवडणुकीसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आठ आजी-माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसच्या दुसºया यादीमध्ये काही नगरसेवकांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
या विद्यमान
नगरसेवकांना संधी..
काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले विठ्ठल लोकरे यांना गोवंडी येथून उमेदवारी जाहीर झाली आहे. मनसेचे संजय तुर्डे, पालिका निवडणुकीनंतर मनसेतून शिवसेनेत आलेले दिलीप लांडे, समाजवादीचे रईस शेख.

या माजी नगरसेवकांना तिकिट...
शिवसेनेतून यामिनी जाधव, काँग्रेसमधून सुरेश कोपरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय पिसाळ, मनसेचे संदीप देशपांडे,

यांचा पत्ता कट..
वडाळामधून इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव, सायन कोळीवाड्यातून इच्छुक मंगेश सातमकर, मुलुंडमधून भाजपाचे प्रकाश गंगाधरे यांना तिकिट मिळवण्यात अपयश आले आहे.
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: Ex-corporator of Mumbai Municipal Corporation is also in the fray for election ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.