Vidhan Sabha 2019 : ४४ लाख मतदार बोगस असल्याचा दावा, नावे तत्काळ वगळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:39 AM2019-09-19T04:39:35+5:302019-09-19T04:40:19+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केंद्री मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे केली.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - Immediately exclude names, claiming 5 lakh voters are bogus | Vidhan Sabha 2019 : ४४ लाख मतदार बोगस असल्याचा दावा, नावे तत्काळ वगळा

Vidhan Sabha 2019 : ४४ लाख मतदार बोगस असल्याचा दावा, नावे तत्काळ वगळा

Next

मुंबई : विधानसभा निवडणूक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची तसेच राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केंद्री मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे केली.
निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौ-यावर असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांची प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी निवडणूक प्रकिया मतपत्रिकेच्या माध्यमातूनच राबविण्याचा आणि मतदार यादीतील बोगस मतदार वगळण्याची मागणी लावून धरली. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या बैठकीत प्रदेश काँग्रेसने ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची माहिती पुराव्यांसह दिली होती. मात्र अद्याप हे सगळे मतदार वगळले गेले नाहीत, असा दावा काँग्रेसने केला. बोगस मतदारांची नावे वगळण्याबाबत आयोगाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप राजेश शर्मा यांनी केला. मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया राबविण्याकरिता बोगस मतदारांची नावे मतदारयादीतून तात्काळ वगळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - Immediately exclude names, claiming 5 lakh voters are bogus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.