Join us

Vidhan sabha 2019 : मुंबईत कुठे खुशी तर कुठे नाराजी; उमेदवारी न मिळाल्याने बंडाचीही तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 4:13 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केल्यानंतर मुंबई शहर जिल्ह्यतील राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे.

मुंबई : भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केल्यानंतर मुंबई शहर जिल्ह्यतील राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. युतीची घोषणा झाल्याने अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. कुलाबा, मलबार हिल आणि मुंबादेवी या तीन मतदारसंघात थेट काँग्रेस विरुद्ध युती अशी लढत असणार आहे. कुलाब्यात काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांनी आज आपोला अर्ज दाखल केला. दुसरीकडे भाजपला अद्याप आपला उमेदवार ठरविता आला नाही. विद्यमान आमदार राज पुरोहित यांना डावलून नगरसेवक मकरंद नार्वेकरांना तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा जोरात आहे. मलबार हिलमध्ये भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांना अर्ज भरला. प्रत्येक निवडणुकीत लोढांचे वाढणारे मताधिक्य रोखायचे कसे, असा प्रश्न इथे कॉंग्रेसला पडला आहे. मुंबादेवीत काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमिन पटेल मैदानात आहेत. ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पांडुरंग सकपाळ यांना शिवसेनेने एबी फॉर्मसुद्धा दिला. त्यामुळे भाजपचे अतुल शाह यांची तयारी वाया गेली.वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने या मतदारसंघाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे. निवडणूक लढविणारे ते पहिले ठाकरे आहेत. या मतदारसंघात टक्कर देऊ शकणारे राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय समीकरणेच बदलून गेली. पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना भायखळा मतदार संघात उमेदवारी मिळाली आहे. येथे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. तर आघाडीने आघाडीकडून मधू चव्हाणांच्या नावाची चर्चा आहे. इथे, शिवसेनेने अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.सायन कोळीवाडा भाजपकडेच आला आणि तिथे विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. काँग्रेसने इथे गणेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. वडाळ्यात कालिदास कोळंबकर भाजपचे उमेदवार असतील. त्यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची यावरून मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. माहीममध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना शिवसेनेने पुन्हा संधी मिळाली आहे. दुस-या क्रमांकावरील मनसेने माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना संधी दिली आहे. तिकडे, धारावीत कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड रिंगणात असणार आहेत.काँग्रेसकडून माहिम येथून प्रवीण नाईक, शिवडीतून उदय फणसेकर, तर मलबार हिल येथून हिरा देवासी यांना उमेदवारी मिळाली आहे़उपनगरातील युती दोन पाऊल पुढेमुंबई : मुंबई शहर उपनगरात एकूण २६ विधानसभा मतदारसंघ आहेत. मंगळवारी उमेदवारी याद्या येऊ लागल्या तशी येथील राजकीय हालचालींना वेग आला. युतीने सर्व चर्चांना फाटा देत मोठ्या चार्तुयाने जागावाटपाचा तिढा सोडविला. पाठोपाठ उमेदवारी जाहिर करत विरोधकांवर कुरघोडीचा प्रयत्न केला. उपनगरातील २६ पैकी १९ जागांवर युतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत तर आघाडीने आतापर्यंत फक्त पाच उमेदवारांची नावे घोषित केली.उपनगरात शिवसेना आणि भाजपच्या वाट्याला प्रत्येकी १३-१३ जागा आल्या आहेत. त्यौपकी शिवसेनेने दहा तर भाजपने नऊ उमेदवार जाहीर केले. यातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्या यादीत ज्येष्ठ भाजप नेते आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुलुंडमधून महिर कोटेचा यांना संधी देण्यात आली. वर्सोव्यातून भारती लवेकरांच्याही नावाची घोषणा झाली नाही. माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांचा पत्ता कापला जाणार का, अशी चर्चा सुरू आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व जागांवरील विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यात मनिषा चौधरी(दहिसर), अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व ), योगेश सागर (चारकोप), विद्या ठाकूर (गोरेगाव), अमित साटम (अंधेरी पश्चिम), पराग अळवणी (विले पार्ले ), राम कदम (घाटकोपर पश्चिम), आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) यांचा समावेश आहे. शिवसेनेने अद्याप भांडुप पश्चिममधून विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. चांदिवलीतून दिलीप लांडे आणि वांद्रे पूर्वेतून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची चर्चा असली तरी अधिकृत घोषणा झालेली नाही.या तीन जागा उर्वरित दहा ठिकाणचे उमेदवार नक्की झाले आहेत. यात प्रकाश सुर्वे (मागाठाणे), सुनिल राऊत (विक्रोळी), रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व), सुनिल प्रभू (दिंडोशी), रमेश लटके (अंधेरी पूर्व), विठ्ठल लोकरे (मानखुर्द शिवाजी नगर), तुकाराम काते (अणुशक्ती नगर), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), मंगेश कुडाळकर (कुर्ला), संजय पोतनीस (कलीना) यांचा समावेश आहे.काँग्रेसने आतापर्यंत भांडूप पश्चिमेतून सुरेश कोपारकर, अंधेरी पश्चिमेतून असोक जाधव, चांदिवलीतून आमदार नसीम खान, चेंबूरमधून चंद्रकांत हंडोरे आणि वांद्रे पूर्वेत झिशान सिद्दीकी या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने रात्री उशिरा जाहिर केलेली उमेदवारांची यादी, कुमार खिलारे (बोरिवली), अरूण सावंत (दहिसर), गोविंद सिंग (मुलुंड) , सुनिल कुमरे (जोगेश्वरी पूर्व) , अंजिता यादव ( कांदिवली पूर्व), कालु बुद्धेलिया (चारकोप), गोरेगाव (युवराज मोहिते), जगदीश अमिन ( अंधेरी पूर्व) , जयंती सिरोया (विलेपार्ले),

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुंबई