Join us

Vidhan Sabha 2019: 'मतदान - मतमोजणीत ३ दिवसांचं अंतर कशासाठी?; गडबड करायची आहे का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 3:00 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ईव्हीएमबाबत सुरुवातीपासून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे अशातच मतदान आणि मतमोजणी यामध्ये 3 दिवसांचे अंतर का? असा सवाल करत या दिवसांमध्ये काही गडबड करायची आहे का?

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमावर विरोधकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शंका उपस्थित केली आहे. 

ईव्हीएमबाबत सुरुवातीपासून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे अशातच मतदान आणि मतमोजणी यामध्ये 3 दिवसांचे अंतर का? असा सवाल करत या दिवसांमध्ये काही गडबड करायची आहे का? अशी शंका लोकांमध्ये सुरु आहे. या 3 दिवसांच्या काळात काहीही होऊ शकते असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. 

तसेच महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जी बैठक घेतली होती त्यात ईव्हीएमबाबत मुद्दा उपस्थित केला होता मात्र  देशभरातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीत भेट घेतली तिथे काय झालं नाही तर महाराष्ट्राच्या बैठकीत काय होणार असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला आहे. 

काही दिवसांपूर्वी ईव्हीएमबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना एकत्र आणत पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये ईव्हीएमवर आक्षेप घेत मुंबईत निवडणूक प्रक्रियेविरोधात मोर्चा काढला जाणार होता. मात्र दरम्यानच्या काळात राज ठाकरेंना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस बजाविण्यात आली. 22 ऑगस्ट रोजी राज ठाकरेंनी तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे ईव्हीएमबाबत विरोधकांच्या आंदोलनाचे पुढे काही झाले याबाबत विचारणा केली असताना भुजबळांनी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं सांगितलं. 

दरम्यान, काही दिवसांपासून छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं त्यावरही भुजबळांनी भाष्य केलं आहे. मागील काही दिवस माझी तब्येत खराब आहे, त्यामुळे काही बैठकांना उपस्थित राहू शकलो नाही. नाशिकमध्ये शरद पवार आले असताना मी मुंबईत काँग्रेससोबतच्या बैठकीला उपस्थित होतो. याची कल्पनाही शरद पवारांना होती. शिवसेनेत प्रवेशाच्या बातम्या फक्त माध्यमांमध्ये होत्या असंही छगन भुजबळांनी स्पष्ट केलं.   

महत्वाच्या बातम्या

...तर राजकारणातून संन्यास घेईन; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना ओपन चॅलेंज 

किल्ल्यात तलवारीऐवजी छमछम आणणार का?-शरद पवार

उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का; साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान, दिवाळीआधीच मतमोजणी

2014च्या विधानसभा निवडणुकीत कुणी जिंकल्या होत्या किती जागा?... संपूर्ण निकाल एका क्लिकवर

टॅग्स :छगन भुजबळनिवडणूकएव्हीएम मशीनराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशिवसेना