आमदाराचे नाव : मंगलप्रभात लोढामतदारसंघ : मलबार हिलवाहतूक कोंडी दूर व्हावी, पार्किंगच्या समस्येवर समाधानकारक तोडगा काढण्याची मागणी. याशिवाय, गिरगाव, खेतवाडी आणि तुळशीवाडी येथील पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी>हे घडलंय...विभाजनाचे प्रतीक असलेल्या जिना हाऊसच्या जागेवर आंतराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्यास मान्यता मिळविली.कोस्टल रोड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावाजुन्या इमारतींच्या पुर्नवसनासाठी कायदा बनविण्यात यशमतदारसंघातील गरीब तीन हजार महिलांना रोजगार देण्यात यशवैद्यकीय सुविधा, विविध सामाजिक सेवा पुरविण्याची सक्षम यंत्रणाऐतिहासिक बाणगंगा परिसराच्या विकासासाठी योजना संमत>हे बिघडलंय...ेमेट्रोमुळे रस्त्यावरील खड्डेप्रमुख रस्त्यांवरील नित्याची वाहतूक कोंडीचाळी आणि धोकादायक इमारतींचे पुर्नवसनपार्किंगची मोठी समस्या. पालिकेच्या वाहनतळावर बाहेरील वाहनांचाच भरणा असल्याने स्थानिकांचा प्रश्न तसाच.>मलबार हिलउच्चभ्रू आणि अमराठी मतदारांचे प्राबल्य असणारा हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच असेल कदाचित, खुद्द मुख्यमंत्रीच येथून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. ११९५ साली भाजपचे मंगलप्रभात लोढा पहिल्यांदा येथून विजयी झाले. त्यानंतर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा सलग पाच निवडणुकांत लोढांची सरशी झाली. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला येथून तब्बल ६० हजारांचे मताधिक्य मिळाले. काँग्रेस उमेदवारासाठी मुकेश अंबानींनी आवाहन केले पण त्याचा फायदा झाला नाही. थेट व्यक्ती, ज्ञाती संस्था, व्यापारी संस्था-संघटना अशा विविध माध्यमातून मतदाराच्या संपर्कात राहण्याची एक यंत्रणाच इथे आहे. ही यंत्रणा अव्याहतपणे कार्यरत राहील याची दक्षता घेतली जाते. काँग्रेसचा जनाधार असलेल्या चाळी, वस्ती हटली आणि काँग्रेसची पिछेहाट झाली.मोदी फॅक्टर निकामी झाला तर लढत देता येईल, अशी काँग्रेसजनांची भूमिका आहे.>विधिमंडळातील कामगिरीमलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून पाच वर्षांच्या काळात सभागृहात ५७६ प्रश्न उपस्थित केले. याशिवाय विविध संसदीय आयुधांचा वापर करत सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदविला. पाच वर्षांच्या काळात सभागृहातील उपस्थिती साधारण ८४ टक्के इतकी होती. विधानसभेत १७२ लक्षवेधी सूचना मांडल्या. ३५ वेळा अर्धा तास चर्चेत सहभाग घेतला. तर, ४४ सर्वसाधारण चर्चा केल्या. तब्बल ४० अशासकीय ठराव पाच वर्षांच्या काळात मांडले. विशेष म्हणजे हुक्का पार्लरवरील बंदीसाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आवाज उठविला होता. त्यासाठी सभागृहात खासगी विधेयकही मांडले. या माध्यमातून हुक्का पार्लरविरोधी कायदा संमत करण्यात यश मिळविले. अनधिकृत हुक्का पार्लरविरोधात कारवाईची मागणी सातत्याने लावून धरली. राज्यातील गोवंश हत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. वैधानिक प्रयत्नातून प्राणी कल्याण महामंडळ स्थापन करण्यात यश मिळविले. सभागृहात मुंबईवरील चर्चांमध्ये कायदा, सुव्यवस्था आणि पुर्नवसनाचे प्रश्न मांडले.>त्यांनाकाय वाटतं?पाच वर्षांच्या कालावधीत मतदारसंघासह मुंबईशी निगडीत विषयांवर काम केले. नव्या पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचविण्यासाठी हुक्का पार्लरवरील बंदीसाठी पाठपुरावा केला. तसे विधेयकच राज्य विधिमंडळात संमत झाले. अनधिकृत हुक्का पार्लरविरोधातील कारवाईसाठी पाठपुरावा केला. मतदारसंघातील तब्बल अडीच युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन व्यवसायाभिमुख बनविले. जुन्या, धोकादायक इमारतींचा पुर्नविकास आणि रहिवाशांच्या हितांच्या रक्षणासाठी सक्षम विधेयकाचा पाठपुरावा केला.- मंगल प्रभात लोढा, आमदार, भाजपमतदारसंघातील सध्याची मोठी समस्या म्हणजे पार्किंग. पुरेसे वाहनतळ नाहीत. जिथे आहेत तिथे बाहेरच्यांनी कब्जा केला आहे. त्यातच आता दंडाची रक्कम वाढली आहे. खेतवाडी, गिरगावातील जुन्या इमारती अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. विकासकांनी प्रकल्प घेतले पण पुढचे काम ठप्पच आहे. येथील पाण्याच्या, मल:निस्सारण वाहिन्यांची दुर्दशा झालेली आहे. तुळशीवाडीतील झोपडपट्टीधारकांच्या पात्रतेचा तिढा अद्याप सुटला नाही. तीन चार इमारती तयार आहेत पण लोकांचे पुर्नवसनच केले जात नाही.- सुनिल नरसाळे,नगरसेवक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष>ळडढ वचनंउद्योगस्रेही मुंबईचे आश्वासनकेंद्रीय शाळांची संख्या वाढवून स्थानिकांसाठी १० हजार जागा निर्माण करणारज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करणार.
Vidhan Sabha 2019: मलबार हिल मतदारसंघाला काय हवं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 1:48 AM