Join us

Vidhan Sabha 2019 : माहिम मतदारसंघाला काय हवं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 12:11 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - फेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटका करावी, पदपथ अतिक्रमणमुक्त करणे, वाहतूककोंडीवर उपाय, वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची सोय करावी,

- आमदाराचे नाव : सदा सरवणकरमतदारसंघ : माहिमफेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटका करावी, पदपथ अतिक्रमणमुक्त करणे, वाहतूककोंडीवर उपाय, वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची सोय करावी, जुन्या इमारतींच्या दुरुस्तीचा, पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागावा.>माहिम मतदारसंघप्रभादेवी, माहिम भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याची तक्रार सोडविण्यासाठी ५६ इंच जलवाहिन्यांवर छेद मार्ग देऊन पाणी समस्या जवळपास संपुष्टात आणली. झोपडपट्टीतील गरीब कुटुंबांना मोफत घर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत सात हजार कुटुंबांना घरे देण्यात आली. झोपडपट्ट्यांमध्ये नवीन शौचालय बांधणे, लादीकरण, जलवाहिन्या टाकणे, पेव्हर ब्लॉक टाकणे, रस्त्याची दुरुस्ती आदी कामे करण्यात आल्याचा दावा सरवणकर यांनी केला आहे.>हे घडलंय...अपुºया पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटलाझोपडपट्ट्यांमध्ये शौचालय, स्वच्छता, लादीकरणाचे कामरस्त्यांची दुरुस्ती, पेव्हर ब्लॉकचे कामप्रभादेवी येथे ज्येष्ठ नागिरकांसाठी बसण्याची व्यवस्थाएसआरएतून ७ हजार कुटुंबीयांना घरगटारवाहिनी, जलवाहिनीची कामेस्मशानभूमीची कामेशिवाजीपार्क सौंदर्यीकरण>हे बिघडलंय...जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न जैसे थेचवाहतुकीची समस्याजुन्या इमारतींमध्ये वाहनतळाची सोय नाहीपोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न कायम>त्यांनाकाय वाटतं?प्रभादेवी, माहिम भागात अपुºया पाणीपुरवठ्यामुळे लोकांचे हाल होत होते. ५६ इंच जलवाहिन्यांवर छेद मार्ग देऊन पाणी समस्या जवळपास संपुष्टात आणली. झोपडपट्टीतील गरीब कुटुंबांना मोफत घर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत सात हजार कुटुंबांना घर देण्यात यश मिळाले याचे समाधान वाटते. मात्र अजूनही जुन्या उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व पुनर्विकास रेंगाळला आहे. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाच्या मार्गातील नेमक्या अडचणींचा अभ्यास करून शासन दरबारी याचा पाठपुरावा करून ही समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. - सदा सरवणकरआमदार, शिवसेना>विधिमंडळातील कामगिरीएका बिगर शासकीय संस्थेने कामगारांच्या कामाच्या मांडलेल्या लेखाजोखानुसार सदा सरवणकर यांना ३० वा क्रमांक देण्यात आला आहे. विधिमंडळात त्यांची उपस्थिती ९४ टक्के होती. २०१४ ते २०१८ या कालावधीत त्यांनी ३६० प्रश्न उपस्थित केले. डिसेंबर २०१८ पर्यंत सरवणकर यांच्यावर पाच एफआयआर, दोन चार्जशीट दाखल होत्या. तर सहा केसेस मागे घेण्यात आल्या आहेत.मराठी लोकवस्ती असलेला माहिम, दादर मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नवीनच स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला दणका दिला. मनसेचे नितीन सरदेसाई आमदारपदी निवडून आले होते. त्या वेळी मनसेला या मतदारसंघात मिळालेल्या मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार तिसºया क्रमांकावर फेकला गेला होता. तर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले सदा सरवणकर यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. २०१४ मध्ये मनसेची हवा सरली आणि पुन्हा शिवसेनेला या मतदारसंघात संधी मिळाली. तरीही मनसेला येथे दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. काँग्रेसला या मतदारसंघात चेहरा नाही़>माहिम, प्रभादेवी, दादर या भागात जुन्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या अधिक आहे. काही इमारती पुरातन वास्तू आहेत. मात्र या इमारती धोकादायक ठरूनही त्यांच्या पुनर्विकासाच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. गेली अनेक वर्षे हा प्रश्न रेंगाळला आहे. यामुळे अशा इमारतींमध्ये राहणारे रहिवासी हवालदिल झाले आहेत. तसेच पोलीस वसाहतींचा पुनर्विकासही अनेक वर्षांपासून मार्गी लागलेला नाही. या इमारतींची दुरवस्था झाली आहे. या मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याची मागणी होत आहे.>आमदारांचे काम काय असते? हे विद्यमान आमदारांना समजून घ्यावं लागेल. पाच वर्षांमध्ये कोणतेही विकासकाम या मतदारसंघात झालेले नाही. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ते अद्याप सोडवू शकलेले नाहीत. पार्किंगची सोय नाही. फेरीवाल्यांची समस्या कायम आहे. लोकांना रस्ता सोडा; पदपथावरूनही चालायला मिळत नाही. विकासाच्या नावाने सर्वच बोंबाबोंब आहे. - संदीप देशपांडे,सचिव - महाराष्ट्र नवनिर्माण सेना>top 5 वचनंएसआरए योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासीयांना घर देणेअपुºया पाणीपुरवठ्याची समस्या सोडवणेझोपडपट्ट्यांमध्ये शौचालय, स्वच्छता, लादीकरणाचे काममाहिम पोलीस वसाहतींचा पुनर्विकासजुन्या इमारतींची दुरुस्ती व पुनर्विकास

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019