Join us

Vidhan Sabha 2019 : वरळी मतदारसंघाला काय हवं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 2:01 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला आहे.

आमदाराचे नाव : सुनील शिंदे, शिवसेनामतदारसंघ : वरळी>बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाला सुरुवात झाली असून वरळीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.>हे घडलंय...वाचनालयांचे नूतनीकरण पूर्णबीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचा पाठपुरावा केल्याने प्रकल्प सुरुसिद्धीविनायक मंदिरातील हंगामी कर्मचाऱ्यांचा शासकीयसेवेत समावेशजलवाहिनीचे नूतनीकरण पूर्णउद्यान नूतनीकरण पूर्ण>हे बिघडलंय...वरळी किल्ल्याचे नूतनीकरण रखडलेवाहतूक कोंडीची प्रमुख समस्याबीडीडी पुनर्विकासाची कासवगतीरस्ता रुंदीकरणात अडथळा>वरळी मतदारसंघआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी मतदारसंघ हा सध्या राजकारणातील केंद्रबिंदू झाला आहे. २००९ ची निवडणुक सोडली असता या मतदार संघात सेनेचे वर्चस्व राहिले आहे. यंदा या मतदार संघातून पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील तरुण नेतृत्त्व असलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे या मतदार संघाची लढत अधिक रंगतदार होणार असून याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मतदार संघात जोरदार मोर्चबांधणी सुरु असून येत्या काळात येथील राजकीय हालचालींना वेग मिळेल.>पाच वर्षांत काय केलं?वरळी मतदार संघात बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न महत्त्वाचा होता. या प्रकल्पाला नुकतीच मान्यता मिळाली आहे, असून पुनर्विकासाचा श्रीगणेशा झाल्याने मतदारांमध्ये समाधानाची भावना आहे. तर दुसरीकडे वरळी येथील कामगार रुग्णालय सुसज्ज करण्यात आले. त्याचप्रमाणे, लादीकरण, जलवाहिनी नूतनीकरण आणि उद्यानांच्या सुभोभीकरण व नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.>विधिमंडळातील कामगिरीप्रजा संस्थेच्या अहवालानुसार, वरळी मतदारसंघातील सुनील शिंदे यांच्या कारकीर्दीनुसार त्यांना पाचव्या स्थानावर प्रमाणित करण्यात आले आहे. त्यांच्या कारकीर्दीला संस्थेने ७९.३८ टक्के दिले असून त्यांचे कार्य चांगले असल्याचे अहवालात म्हटले आहे. शिंदे यांनी तिन्ही अधिवेशनात तब्बल ९४० प्रश्न विचारले असून सवार्धिक प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात १५३ प्रश्न शिंदे यांनी विचारले आहेत. तर हिवाळी अधिवेशनात ११६ प्रश्न विचारले आहेत.>आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी सेनेत प्रवेश केल्याने आता या मतदार संघात सेनेला कोणताही अडसर उरलेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सुनिल राणे तर काँग्रेसकडून दत्ता नवघणे रिंगणात होते. नवघणे यांना जेमतेम पाच हजार मते मिळाली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचाही उमेदवार रिंगणात असेल. मात्र सेनेच्या मतांवर याचा फारसा परिणाम होताना दिसणार नाही.>विधानसभा २०१४ निकालसुनील शिंदे, शिवसेना-६०,६२५सचिन अहिर, राष्ट्रवादी३७,६१३सुनील राणे, भाजप -३०,८४९दत्तात्रय नवघणे, काँग्रेस-५,९४१नोटा - १५५९मतदानाची एकूण टक्केवारी५५.९३ टक्के> वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल असला तरी या प्रकल्पाचे काम अत्यंत कासवगतीने सुरु आहे. केवळ निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दिखाव्याकरिता लोक प्रतिनिधींनी याचा घाट घातला आहे. शिवाय, कोस्टल रोडच्या प्रश्नावर स्थानिक प्रतिनिधी कोणतीही ठाम भूमिका घेत नाही, हे चुकीचे आहे.- दत्ता कायंदे, स्थानिक रहिवासी>TOP वचनंवरळी किल्ला नूतनीकरणपुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणारआरोग्य केंद्र दर्जा सुधारणाशाळांची दुरुस्ती करणारशौचालयांची दुरुस्तीज्येष्ठ नागरिकांनाविशेष सेवा

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आदित्य ठाकरेकाँग्रेस