Vidhan Sabha 2019: ...अन् बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन आदित्य ठाकरे झाले नतमस्तक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 11:29 AM2019-10-03T11:29:41+5:302019-10-03T11:33:00+5:30
ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच एखादी व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात
मुंबई: राज्याच्या राजकारणात ५० वर्षांपासून सक्रीय असलेलं ठाकरे घराणं कधीही राजकारणात उतरलेलं नाही. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे असो,वा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना करणारे राज ठाकरे, यापैकी कोणत्याही नेत्यानं कधीही स्वत: निवडणूक लढवलेली नाही. मात्र आदित्य ठाकरेंनी ही परंपरा मोडीत काढली आहे. आदित्य वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
Vidhan Sabha 2019: मंत्री विनोद तावडेंचा पत्ता कट? 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
आदित्य ठाकरे थोड्याच वेळात निवडणूक अर्ज दाखल करतील. त्या निमित्तानं वरळीत शिवसेनेचं जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. तत्पूर्वी आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवरुन निघताना बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. अर्ज भरण्यासाठी घरातून निघताना आदित्य आजोबांच्या खोलीत गेले. त्या ठिकाणी असलेल्या बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक झाले. आदित्य यांनी हा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये बाळासाहेबांनी वापरलेल्या विविध वस्तू दिसत आहेत. यामध्ये बाळासाहेबांचा बेड, त्यावर बाळासाहेबांची स्वाक्षरी असलेली उशी, त्यांचं उपरणं, काही पुस्तकं, कागदपत्रं यांचा समावेश आहे.
आदित्य ठाकरेंना काकांचा 'मनसे' पाठिंबा; आज भरणार उमेदवारी अर्ज
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 3, 2019
वरळीतून लढणाऱ्या आदित्य ठाकरेंसमोर फारसं आव्हान नाही. सध्या शिवसेनेचेच सुनील शिंदे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहिर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी असेल. आदित्य रिंगणात असल्यानं राज ठाकरेंच्या मनसेनं वरळीत उमेदवार दिलेला नाही. मनसेनं जाहीर केलेल्या दोन यादींमध्ये वरळी मतदारसंघाचा समावेश नाही.