Join us

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 7:55 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मबंईत आजपासून महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात होत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून होत आहे. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांची एकत्रित सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेसचेराहुल गांधी, राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. या सभेत महाविकास आघाडीने ५ गॅरंटी जाहीर केले.

Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 

महाविकास आघाडीची पहिलीच सभा मुंबईतील बीकेसी येथे होत आहे. यावेळी तिनही पक्षातील दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीची जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीने जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा केल्या आहेत. या मोफत बससेवा, शेतकऱ्यांसाठी  ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन.जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील. बेरोजगार तरुणांना ४ हजार रुपयांपर्यंत मदत अशा मोठ्या योजनांचा समावेश आहे.  

यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले, ⁠राहूल गांधी जे संविधान दाखवतात त्या लाल रंगावरुन फडणवीस यांनी नक्षलवादी म्हटल, ⁠मात्र आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो, असा पलटवार पटोले यांनी केला.महाविकास आघाडीच्या ५ गॅरेंटी काय आहेत?

महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.

•    शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन.

•    जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.

•    २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.

•    बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४राहुल गांधीनिवडणूक 2024काँग्रेसमहाविकास आघाडी