Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! सदा सरवणकर निवडणूक लढवणार, राज ठाकरेंनी भेट नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 03:07 PM2024-11-04T15:07:52+5:302024-11-04T15:08:11+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत आज अर्ज माघार घेण्यासाठी शेवटची मुदत होती. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, सरवणकर आज अर्ज मागे घेतील अशा चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करुन मार्ग काढण्यास सांगितलं. दरम्यान, आमदार सदा सरवणकर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते पण ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट नाकारली. सरवणकर यांनी आता निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली .
"मनोज जरांगेंनी घेतलेल्या निर्णयाचा मला आनंद"; शरद पवार म्हणाले, "उमेदवार दिले असते तर..."
माहीम विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून सस्पेन्स होता. आमदार सदा सरवणकर उमेदवारी मागे घेतील अशी चर्चा होती. दरम्यान, आज सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि काही कार्यकर्ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी गेले होते, यावेळी ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट दिली नाही. दरम्यान, या भेटीवर बोलताना सदा सरवणकर म्हणाले, आम्ही राज ठाकरे यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिली नाही. तुम्ही निवडणूक लढणार असाल तर लढा, असं राज ठाकरेंनी सांगितल्याचे सरवणकर म्हणाले. यामुळे आता मी निवडणूक लढणार आहे, असंही सदा सरवणकर म्हणाले.