Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 07:07 PM2024-11-10T19:07:30+5:302024-11-10T19:17:18+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, विक्रोळीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, विक्रोळीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. विक्रोळीत पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एख कॅश व्हॅन पकडली आहे. या व्हॅनमध्ये साडे सहा टन चांदीच्या विटा पकडल्या आहेत.
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
मिळालेली माहिती अशी, करोडोंच्या घरात यांची किंमत आहे. या चांदीच्या विटा मुलुंड मधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चालल्या होत्या या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुक आयोग, इन्कम टॅक्स, पोलिसांनी अधिक तपास करत आहेत.
कारमध्ये सापडले २ कोटी रुपये
काही दिवसापूर्वी मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले होते. पोलिसांनी आज नाकाबंदीदरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारी एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८ या गाडीत २ कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८ या गाडीत रोख रक्कम आढळून आली आहे. या गाडीत अंदाजे २ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम पोलिसांनी जप्त केली.