Join us

Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 10:05 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आज महाविकास आघाडीची मुंबईत संयुक्त सभा पार पडली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ):  विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईत झाली. या सभेत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पण, सभेच्या सुरुवातीलाच कायम शांत, संयमी असणार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भडकल्याचे दिसले. बीकेसी येथे सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना मुंबई पोलिसांनी अडवले, यावेळी उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओत उद्धव ठाकरे पोलिसांच्यावर भडकल्याचे दिसत आहे. यानंतर काहीवेळाने एका अधिकाऱ्याने ठाकरेंना विनंती केली. यानंतर ते पुढे गेल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 

देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

नेमकं काय घडलं?

आज महाविकास आघाडीची बीकेसी येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सभास्थळी जात असताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना अडवले. सुरक्षा रक्षकांना आत जाण्यास प्रवेश पोलिसांना नाकारला. यावेळी उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले आणि सुरक्षा रक्षकांना आत घेण्यास सांगितले. 

यावेळी त्या ठिकाणी गोंधळ झाला. यावेळी उद्धव ठाकरे संतापले आणि ते पोलिसांना उद्देशून म्हणाले की, कोण आहे तो? त्याचं नाव घेऊन ठेवा.

दरम्यान, आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४उद्धव ठाकरेशिवसेनानिवडणूक 2024