Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत ‘नोटा’ने गाठला ७० हजारांचा आकडा; मुंबईकरांची मतपेटीतून नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 08:53 AM2024-11-24T08:53:55+5:302024-11-24T08:55:36+5:30
मुंबईकरांनी व्यक्त केली मतपेटीतून नाराजी; सर्वाधिक नोटा मते अणुशक्तीनगरमध्ये
सीमा महांगडे
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांत ७० हजारांहून अधिक मतदारांनी हक्क बजावताना ‘नोटा’ मतांना पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक नोटा मते अणुशक्तीनगरमध्ये असून त्याची संख्या ३,८८४ आहेत तर सगळ्यात कमी नोटा मते मानखुर्द शिवाजी नगरमध्ये असून त्यांची संख्या फक्त १३० आहे. उमेदवाराबाबत नाराजी आणि नापसंती दर्शवण्यासाठी मुंबईकरांनी ‘नोटा’ पर्याय स्वीकारलेला दिसून आले.
मुंबई शहर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी १३ लाख ३९ हजार २९९ नागरिकांनी मतदान केले तर मुंबई उपनगरात ४३ लाख ३४ हजार ५१३ नागरिकांनी मतदान केले. त्यामुळे एकूण मतदारांपैकी जवळपास १.२४ टक्के लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६ मतदारसंघात ५४.०६ टक्के मतदान झाले होते. त्यातील ७५ हजार २६३ मतदारांनी ‘नोटा’ला मत दिले. त्याची टक्केवारी १.४० इतकी होते. या टक्केवारीनुसार लोकसभा निवडणूकीपेक्षा कमी लोकांनी यावेळी नोटाला पसंती दर्शवली आहे. टक्केवारीनुसार सर्वाधिक १.७४ टक्के ‘नोटा’ मते मुंबई दक्षिण या मतदारसंघात पडली.
मतदार संघ
- अणुशक्ती नगर ३,८८४
- सायन-कोळीवाडा १,८९०
- मलबार हिल २,०१५
- कुलाबा १,१९३
- मुंबादेवी १,११३
- चारकोप २,३१३
- बोरीवली ३,६३७
- कांदिवली पूर्व २,१६२
- मालाड पश्चिम १,५०२
- चांदिवली २,२४७
- कुर्ला १,५९४
- कालिना १,६६७
- मुलुंड ३,८३४
- भांडुप २,४०६
- विक्रोळी १,७०९
- घाटकोपर पूर्व १,७१९
- घाटकोपर पश्चिम १,३८७
- चेंबूर २,०१८
- मानखुर्द- शिवाजी नगर १३०
- माहीम १,५५३
- वडाळा १,७०८
- धारावी १,७५६
- वरळी १,५६२
- भायखळा १,५८१
- शिवडी २,४६०
- अंधेरी पश्चिम १,८२२
- अंधेरी पूर्व १,५१०
- दिंडोशी १,५३०
- गोरेगाव १,८०५
- दहिसर २,१९१
- वर्सोवा १,२९८
- जोगेश्वरी पूर्व २,८८७
- मागाठाणे २,८१८
- वांद्रे पूर्व १,९१२
- वांद्रे पश्चिम १,६७८
- विलेपार्ले २,२५५