Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 03:15 PM2024-11-24T15:15:21+5:302024-11-24T15:16:07+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : माहीम मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights Mahesh Sawant Amit Thackeray Sada Sarvankar Mahim | Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं

Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं

माहीम मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. दुसऱ्या नंबरवर सदा सरवणकर यांचा १७०० मतांनी पराभव झाला आहे. विजयानंतर ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "दोन बलाढ्य आहेत, त्यांच्यासमोर आपला टिकाव लागेल की नाही ही शंका होती. परंतू जनतेवर पूर्ण विश्वास होता" असं म्हटलं आहे.  

"आपल्याला जिंकायचं आहे या पद्धतीने ही लढत बघितली होती. त्या उद्देशाने मी या आखाड्यात उतरलो होतो. दोन बलाढ्य आहेत, त्यांच्यासमोर आपला टिकाव लागेल की नाही ही शंका होती. परंतू जनतेवर पूर्ण विश्वास होता. बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा आशीर्वाद होता. जिंकणार हे माहीत होतं. अमित ठाकरे नवखे होते. राजकारणाची एवढी त्यांना माहिती नव्हती. थोडी धाकधूक होती. शिवाजी पार्कचा पट्टा मनसेला मिळेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही."

"महेश सावंत आक्रमक पद्धतीने प्रश्न मांडणार. जसा रस्त्यावर आहे तसाच विधानभवनात असणार" असं महेश सावंत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. "आज आमच्यासमोर दोन तगडे उमेदवार होते. एक धनवान होता... ज्यांची प्रॉपर्टी किती असेल हे त्यांनाच माहीत नसेल आणि दुसरीकडे एक राजपुत्र होता. त्यांच्यासमोर आम्हाला टफ द्यायची होती. तो दिवस आज आलेला आहे" असं महेश सावंत यांनी काल विजयांनंतर म्हटलं होतं. 

"सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे. पुढचे पाच वर्षे मी एवढं काम करणार आहे की, आमदार कसा असावा हे संपूर्ण जनतेला समजेल. खूप टफ झाली पण मी विजयी झालो. त्यांच्याकडे पोलीस पॉवर होती, सर्व पॉवर होत्या... तरीपण मी एका जिद्दीने बाळासाहेबांचा सैनिक जसा लढतो तसा लढलो. आमच्या विभागावर बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. आम्ही आमचा भगवा डौलाने फडकवला आहे" असंही सावंत यांनी म्हटलं होतं.  
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights Mahesh Sawant Amit Thackeray Sada Sarvankar Mahim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.